आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Farmer Parliament Begins Today On Singhu Border, Decision To Talk To The Government Is Possible

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रॅक्टर परेडवर सस्पेंस:​​​​​​​शेतकऱ्यांचा दावा - 'परेडची मंजूरी मिळाली, 5 मार्गांनी दिल्लीत दाखल होणार'; दिल्ली पोलिस म्हणाले - 'शेतकऱ्यांनी रुट सांगितला नाही'

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शांततापूर्ण रॅलीला मंजुरी, दिल्लीत थांबण्याची परवानगी नाही

शेतकरी संघटनांनी दावा केला आहे की, 26 जानेवारीला शेतकरी परेडसाठी दिल्ली पोलिसांनी मंजूरी दिली आहे. शेतकऱ्यांनी याला 'किसान गणतंत्र परेड' असे नाव दिले आहे. त्यांनी म्हटले की, आंदोलक ट्रॅक्टरवर वेगवेगळ्या रस्त्यांनी दिल्लीमध्ये दाखल होतील आणि या दरम्यान जवळपास 100 किलोमीटरचा प्रवास करतील. मात्र पोलिसांनी सांगितले आहे की, सध्या चर्चा शेवटच्या टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेडचा रुट लिखित स्वरुपात दिलेला नाही. त्यांनी रुट सांगितल्यावर आम्ही निर्णय घेऊ.

दिल्ली पोलिसांनी सिंघु बॉर्डर ते खरखौदा टोल प्लाझा या मार्गावरुन परेडसाठी ऑफर दिली होती. हा मार्ग 63 किलोमीटरचा आहे. तेव्हा शेतकरी संघटनांनी त्यांना 100 किमीपर्यंत ट्रॅक्टर परेड घ्यायचे असल्याचे सांगितले होते.

शांततापूर्ण रॅलीला मंजुरी, दिल्लीत थांबण्याची परवानगी नाही
या आंदोलनाशी संबंधित स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी शनिवारी दिल्ली पोलिस आणि शेतकर्‍यांमधील चर्चा एका निष्कर्षापर्यंत पोहोचल्याचे सांगितले होते. 26 जानेवारी रोजी पोलिस बॅरिकेड्स उघडतील आणि आम्ही दिल्लीत प्रवेश करू. तसेच ते म्हणाले होते की, या रॅलीचा अंतिम मार्ग रविवारी फायनल करण्यात येईल.

काही अहवालांमध्ये असे म्हटले जात आहे की, सिंघु, टीकरी, गाझीपूर, पलवल आणि शाहजहांपूर या सीमावर्ती भागातून शेतकरी दिल्लीत प्रवेश करतील. यावेळी त्यांना शांततेत ट्रॅक्टर रॅली काढावी लागणार आहे. मात्र, मोर्चानंतर आंदोलकांना दिल्लीत राहू दिले नाही. त्यांना पुन्हा सीमावर्ती ठिकाणी जावे लागेल जेथे दोन महिन्यांपासून ते कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन आहेत.

ट्रॅक्टर परेडची तयारी तीव्र
सुमारे महिनाभरापासून शेतकरी ट्रॅक्टर परेडची तयारी करत आहेत. पंजाबमधील अनेक शहरे आणि खेड्यांमध्ये याची तालीम होत आहे. पंजाबमधील अनेक जिल्ह्यांतील शेतकरी ट्रॅक्टरसह दिल्लीकडे रवाना होत आहेत.

बातम्या आणखी आहेत...