आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी आंदोलनाचा 40 वा दिवस:8 व्या टप्प्यातील बैठकीतून निघाली फक्त 9 व्या फेरीच्या बैठकीची तारीख

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू असताना शेतकरी नेत्यांनी भोजन केले. - Divya Marathi
केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू असताना शेतकरी नेत्यांनी भोजन केले.
  • 8 जानेवारीला पुन्हा शेतकरी - सरकारची चर्चा

नव्या कृषी कायद्यांबाबत शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यातील सातव्या टप्प्याची चर्चाही निष्फळ ठरली. आता पुढील चर्चा ८ जानेवारीला होईल. विज्ञान भवनातील बैठकीत शेतकऱ्यांनी पुन्हा सरकारी भोजन घेण्यास नकार दिला. त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना सांगितले, ‘तुम्ही तुमचे जेवण घ्या, आम्ही आमचे घेऊ.’ सोमवारच्या बैठकीत सरकारने कायद्यांत दुरुस्ती करू, अशी भूमिका घेतली. शेतकरी मात्र कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम राहिले. किमान हमी दराच्या मुद्द्यावरही कुठलाही मार्ग निघाला नाही. त्यामुळे चर्चेत या वेळीही सहमती होऊ शकली नाही.

दिल्लीच्या सीमांवरील शेतकरी आंदोलनाला सोमवारी ४० दिवस पूर्ण झाले. संघटनांनुसार आंदोलनात आतापर्यंत ६० वर शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. बैठकीत या सर्वांना केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, रेल्वेमंत्री पीयूष गोयल व उद्योग राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. शेतकरी नेते राकेश टिकेत म्हणाले, ‘८ जानेवारीच्या चर्चेतही एमएसपी व कायदे रद्द करा हेच आमचे मुद्दे राहतील.’ शेतकरी संघटना आता ६ जानेवारीला कुंडली-मानेसर-पलवल एक्स्प्रेसवर व २६ जानेवारीला दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चा काढतील. दुसरीकडे, हरियाणात रेवाडी जिल्ह्यात दिल्ली-जयपूर महामार्गावरून शेतकऱ्यांचे गट दिल्लीला निघाले. पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रुधुराचा मारा केला.

पंजाबमध्ये टॉवरच्या तोडफोडप्रकरणी रिलायन्स हायकोर्टात, म्हणाले - कंत्राटी शेतीत उतरणार नाही आंदोलक शेतकऱ्यांनी जिओच्या मोबाइल टॉवरचे नुकसान केल्याच्या तसेच तोडफोड केल्याच्या प्रकरणात रिलायन्सने पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रिलायन्स जिओने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. कृषी कायद्यांवरून वादाशी आमचे काहीही देणे-घेणे नाही, असेही त्यात म्हटले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजतर्फे म्हटले की,‘ या कायद्यांशी नाव जोडणे हा आमच्या व्यवसायाला नुकसान पोहोचवण्याचा आणि बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. कंपनी कॉर्पोरेट किंवा कंत्राटी शेती करत नाही. या क्षेत्रात उतरण्याची आमची कुठलीही योजना नाही.’

टाळी दोन्ही हातांनी वाजते : कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर
एमएसपीवरही शेतकरी संघटनांशी चर्चा झाली. पण ते कायदे मागे घेण्यासाठी अडून राहिल्याने कुठलाही निर्णय होऊ शकला नाही. टाळी दोन्ही हातांनी वाजते. देशात कोट्यवधी शेतकरी आहेत, सरकारने त्या सर्वांचे हित लक्षात घेऊन कायदे बनवले आहेत. अशा मुद्द्यांवर चर्चेच्या अनेक फेऱ्या होत असतात.’ - नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय कृषिमंत्री

क्रूर सरकारवर विश्वास कसा ठेवावा : प्रियंका
सरकार एकीकडे शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावते. दुसरीकडे कडाक्याच्या थंडीत त्यांच्यावर अश्रुधूर सोडला जात आहे. या अडेलतट्टू आणि क्रूर वर्तणुकीमुळे आतापर्यंत जवळपास ६० शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले आहेत. शेतकऱ्यांनी या क्रूर सरकारवर कसा विश्वास ठेवावा?’ - प्रियंका गांधी-वाड्रा, काँग्रेसच्या सरचिटणीस

बातम्या आणखी आहेत...