आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Farmer Protest Delhi । If No Settlement Is Reached By November 26, Farmers Will Besiege Delhi' Rakesh Tikait Challenges Govt

टिकैत यांचे आव्हान:'26 नोव्हेंबरपर्यंत तोडगा निघाला नाही तर, शेतकरी दिल्लीला चारही बाजूंनी घेराव घालतील' राकेश टिकैत यांचे केंद्र सरकारला आव्हान

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांवरून गेल्या वर्षभरापासून शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करीत आहे. शेतकरी आंदोलनाची सुरुवात नोव्हेंबर 2020 पासून सुरु झाली होती, त्याला आता एक वर्षाचा काल लोटला आहे. मात्र यावर अद्याप कोणत्याही प्रकारे तोडगा निघालेला नाही.

त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला आव्हान दिले आहे. येत्या 26 नोव्हेंबरपर्यंत केंद्र सरकारकडे वेळ असून, सरकार योग्य ती भुमिका घ्यावी अन्यथा 27 नोव्हेंबरला संपुर्ण दिल्ली ट्रॅक्टरने घेरली जाईल. असा थेट इशारा टिकैत यांनी सरकारला दिला आहे.

टिकैत म्हणाले की, 'केंद्र सरकारकडे 26 नोव्हेंबरपर्यंत वेळ असून, जर काही तोडगा निघाला नाही तर 27 नोव्हेंबरला गावा-गावातून शेतकरी ट्रॅक्टर घेत दिल्लीला चारही बाजूने दाखल होत, दिल्लीला पुर्णपणे घेरण्यात येईल' असे ट्विट राकेश टिकैत यांनी केले आहे.

बॉर्डरवरील मार्ग खुला करण्यात आला
गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या आंदोलनामुळे आंदोलनस्थळातील आजू-बाजूचे नागरिक त्रस्त झाले होते. त्यामुळे स्थानिकांनी आंदोलनकर्त्यांना उठवण्याची मागणी केली होती. त्यावर सुनावणी करत न्यायालयाने म्हटले होते की, आंदोलन करण्याचा हा त्यांचा अधिकार असून, त्यांनी कोणत्याही प्रकारे रस्ता बंद केलेला नाही.

ते त्यांच्या पद्धतीने आंदोलन करत आहे, उलट पोलीसांनीच रस्ता बंद केला असून, लवकरात रस्तावरील बॅरिकेट्स काढण्यात यावे असे न्यायालयाने म्हटले होते. त्यानंतर मागच्या आठवड्यात शेतकरी आणि सरकारमध्ये 3 दिवस बैठक असून, रस्त्यावरील बॅरिकेट्स हटवून पाच फुटाचा रस्ता उघडण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना रोखण्यासाठी लावण्यात आले बॅरिकेट्स
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात नोव्हेंबर 2020 मध्ये दिल्लीत सीमांवर आंदोलनाची हाक देण्यात आली होती. दिल्लीतील हरियाणा, सिंघू आणि टिकरी या सीमांवर शेतकरी आंदोलन करत होते. शेतकऱ्यांना दिल्लीत न येण्यासाठी पोलीसांनी बॅरिकेट्स लावले होते. 26 जानेवारी 2021 रोजी घडलेल्या लाल किल्ला परिसरातील हिंसाचार यामुळे येथे काँक्रिटचे बॅरिकेट्स लावण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...