आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:आंदाेलक शेतकऱ्यांच्या चक्री उपोषणास सुरुवात, केंद्राशी चर्चेच्या प्रस्तावावर शेतकरी संघटनांची आज बैठक

सिंघू बाॅर्डर/नवी दिल्ली/पाटणा7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंदोलन सुरू असताना शेतकऱ्यांच्या कसरतीही सुरू आहेत. - Divya Marathi
आंदोलन सुरू असताना शेतकऱ्यांच्या कसरतीही सुरू आहेत.

केंद्राच्या ३ नव्या कृषी कायद्यांविरुद्ध दिल्ली सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारपासून चक्री उपोषण सुरू केले आहे. यात शेतकरी २४-२४ तासांनी एका समूहाने उपोषणास बसणार आहेत. यासोबतच शेतकऱ्यांनी आपले आंदोलन तीव्र करण्याचीही घोषणा केली. तसेच चर्चेसाठी केंद्राच्या प्रस्तावावर शेतकरी नेते मंगळवारी बैठक करणार आहेत.

भारतीय किसान युनियन दोआबाचे प्रमुख आणि पंजाबचे शेतकरी नेते मंजित सिंह म्हणाले, सरकार वारंवार चर्चेचा मुद्दा मांडून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. सरकारसोबत चर्चा करायची ही नाही, हे मंगळवारच्या बैठकीनंतर ठरवले जाईल. आम्ही ६ महिने येथेच तळ ठाेकू, असा निर्धारही शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी २५ ते २७ डिसंेबरपर्यंत टाेल नाके नि:शुल्क करण्याची घाेषणा केली. दरम्यान, शेतकऱ्यांना ब्लँकेट वाटण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीच्या वाहनाला समाजकंटकांनी आग लावली. दुसरीकडे, भाजपने कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये किसान चाैपाल सुरू केली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी ६० शेतकरी चावडी कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे पक्षाने सांगितले.

आंदोलनाहून परतलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या
सोमवारी पंजाबच्या फिरोजपूरमध्ये शेतकरी कुलबीर सिंह यांनी सोमवारी आत्महत्या केली. ते दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सहभागी होऊन परतले होते. त्यांच्यावर सुमारे ८ लाख रुपयांचे कर्ज आहे. दुसरीकडे, पंजाबच्याच तरणतारण िजल्ह्यातील भट्ठल गावचे ७५ वर्षीय शेतकरी निरंजन िसंह यांनी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

बातम्या आणखी आहेत...