आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Farmer Protest New Trend : Now The Trend Of Stickers Like Love Farming And No Farmer No Food Has Reached The Wedding Cards

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी आंदोलनाने बदलला ट्रेंड:हरियाणात आता लग्नपत्रिकेवर नांग-ट्रॅक्टरचे फोटो; आय लव्ह शेती आणि नो फार्मर-नो फूड सारख्या स्टीकर्सचाही वाढला ट्रेंड

कैथलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिल्यांदाच छोटूराम, भगत सिंग यांचे फोटो छापले जात आहेत

कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनामुळे हरियाणामधील लग्नपत्रिका आणि वाहनांवरील घोषणाबाजीचा ट्रेंड बदलला आहे. आता लोक लग्नपत्रिकेवर ट्रॅक्टर आणि नांगराचे फोटो लावत आहेत. तर काही जण आपल्या लग्झरी गाड्यांवर आय लव्ह शेती, नो फार्मर-नो फूड यांसारखे स्लोगन लिहीत आहेत.

14 फेब्रुवारी रोजी लग्नाचा शुभ मुहूर्त आहे. प्रिटिंग प्रेसवाल्यांचे म्हणणे आहे की, लग्नाच्या प्रत्येक दुसऱ्या पत्रिकेवर शेतकरी समर्थनार्थ स्लोगन छापले जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांसोबत नोकरवर्गाचाही समावेश आहे.

सीमेवर गेलो नाही, म्हणून कार्डवरून दिला संदेश

कैथल निवासी प्रवीण ढुल यांचा 14 फेब्रुवारी रोजी विवाह आहे. ते म्हणाले की, मी एमकॉम, बीएड केले असून सध्या शहरात राहतो. वडील, आजोबा, पंजोबा सर्व शेतीशी संबंधित होते. वडील दिल्ली सीमवेर आंदोलन करत आहेत. मात्र मी दिल्लीला जाऊ शकत नाही, त्यामुळे कार्डवर संदेश लिहून या आंदोलनाला पाठिंबा देत आहे.

पहिल्यांदाच छोटूराम, भगत सिंग यांचे फोटो छापले जात आहेत

शहरातील एक प्रिटिंग प्रेस चालक दिनेश शर्मा यांनी सांगितले की, लोक पहिल्यांदाच लग्नपत्रिकेवर शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ स्लोगन लिहीत आहेत. याशिवाय भगत सिंग, सर छोटूराम यांसारख्या महापुरुषांचे फोटो छापण्याचा ट्रेंड वाढला आहे. प्रत्येक दुसरा ग्राहक लग्नपत्रिकेवर शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ स्लोगन छापत आहे. स्टीकर लावणारे राज सिंग यांनी सांगितले की, आधी ग्राहक आपल्या वाहनावर पोलिस, प्रेस, आर्मी, स्वतःची जात, गोत्राचे स्टीकर लावत होते. मात्र आता ट्रेंड बदलला आहे.

बातम्या आणखी आहेत...