आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Farmer Protest : Police Gives Permission To Tractor Parade : Farmers Will Enter In Delhi On 26 Th January

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रॅक्टर परेडला पोलिसांची मंजुरी:शेतकरी 26 जानेवारी रोजी गाझीपूर, सिंघू आणि टिकरी सीमेवरुन दिल्लीत करणार प्रवेश, त्याच दिवशी बॅरिकेड्स काढली जातील

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शनिवारी दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या चर्चेनंतर पोलिसांनी शेतकऱ्यांना दिल्लीत परेड काढण्याची परवानगी दिली

कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांचे म्हणणे सरकार कदाचित ऐकणार नाही, परंतु पोलिसांना ती ऐकावी लागली. शेतकरी 26 जानेवारी रोजी दिल्लीत ट्रॅक्टर परेड काढण्यावर ठाम होते. दिल्लीबाहेर परेड न काढण्यासाठी दिल्ली पोलिस त्यांना 5 दिवसांपासून समजावण्याचा प्रयत्न करीत होते. पण, पोलिसांना शेतकऱ्यांसमोर नमावे लागले. शनिवारी दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या चर्चेत पोलिसांनी शेतकऱ्यांना दिल्लीत परेड काढण्यास परवानगी दिली आहे.

शेतकरी आंदोलनाशी संबंधित स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव म्हणाले की, "26 जानेवारी रोजी शेतकरी परेड काढतील. बॅरिकेड्स हटवले जातील आणि आम्ही दिल्लीत प्रवेश करू. पोलिसांशी बोलताना ट्रॅक्टर मार्चच्या मार्गावर सहमती दर्शविली गेली आहे. अंतिम तपशील आज रात्रीपर्यंत तयार केला जाईल." दरम्यान, गाझीपूर, सिंहू व टिकारी सीमेवरुन ट्रॅक्टर परेड सुरू होईल असे शेतकरी नेते अभिमन्यू कोहार यांनी सांगितले.

ट्रॅक्टर मोर्चाची तयारी वेगात सुरू

शेतकरी सुमारे एका महिन्यापासून ट्रॅक्टर मोर्चाची तयारी करत आहेत. पंजाबमधील अनेक शहरे आणि खेड्यांमध्ये याची तालीम होत आहे. पंजाबमधील अनेक जिल्ह्यांतील शेतकरी ट्रॅक्टर घेऊन दिल्लीकडे रवाना होत आहेत.