आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी आंदोलन ग्राउंड रिपोर्ट:तापमान 4 अंश, झाेंबणाऱ्या वाऱ्यातही शेतकऱ्यांचा वज्रनिर्धार

राजेश खाेखर, कुंडली सीमेवरून7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हजारो शेतकऱ्यांना रक्त गोठवणाऱ्या थंडीत रात्र काढावी लागली, मृत्यूचे प्रमाण वाढले

सीमेवर शेतकरी अतिशय थाटमाटात आंदोलन करत आहेत, अशी छायाचित्रे मध्यंतरी समोर आली होती. परंतु वास्तव ते नव्हते. आंदोलन करणारे बहुतांश शेतकरी दररोज कडाक्याच्या थंडीचा मुकाबला करत आहेत. ट्रॅक्टरच्या सीटवर त्यांना रात्र काढावी लागत आहे. त्याविषयीचा हा वृत्तांत...

थंडीचा कडाका भीती घालताेय. परंतु शेतकऱ्यांचा निर्धार कायम आहे. सरकार किंवा गारठवणाऱ्या रात्रीमुळे ते मुळीच डगमगलेले नाहीत. बुधवारी सायंकाळी संत बाबा रामसिंह यांच्या आत्महत्येनंतर शेतकरी हादरले हाेते. शेतकऱ्यांचे नातेवाईक चिंतेत आहेत. अशा प्रकारच्या घटना घडताच ते फाेन करून ख्यालीखुशाली विचारतात. बुधवारी याच रात्री आम्हीही शेतकऱ्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी रस्त्यावर उतरलाे हाेताे. तापमान ४ अंश सेल्सियस व ताशी १२ किमी वेगाने वाहणारा गार वारा यामुळे थंडी चांगलीच झाेंबत हाेती. रात्री ११ च्या सुमारास काम बंद करून सगळे झाेपण्याच्या तयारीत हाेते. एके ठिकाणी लांबच लांब रांग लागलेली हाेती. येथे सगळे लाेक झाेपण्याची काही व्यवस्था हाेतेय का, हे पाहण्यासाठी आले हाेते. येथे उभे असलेले अनमाेलसिंह म्हणाले, तासाभरापासून रांगेत आहे. झाेपण्यासाठी पांघरूण मिळावे यासाठी प्रयत्न करताेय. मात्र या भागातही गर्दी झाली तर एखाद्या ट्राॅलीखाली रात्र काढावी लागेल. छावणीत २०० हून जास्त शेतकरी झाेपलेले हाेते. छताच्या नावावर असलेला टेंट व जमिनीवर चादर हाेती. विश्रांती घेत असलेले हरप्रीतसिंह यांना एवढ्या थंडीत कसे काय थांबलेला आहात, असे विचारले असता ते म्हणाले, आमचे तरी बरे आहे. बाहेर रस्त्यावर जाऊन बघा. आमच्या बंधू-भगिनींवर कशा प्रकारे रात्र काढण्याची वेळ सरकारने आणली आहे. आमचा माेर्चा पुढे वळला. तेथे तर काही लाेक मध्यरात्रीपासूनच स्नान करताना दिसले.

रात्रीपासून स्नानासाठी नंबर लावावा लागताे. कारण नंबर लावला तर बाहेर रस्त्यावर थंडीत बर्फासारख्या पाण्याने स्नान करावे लागते. आणखी पुढे गेलाे. तेव्हा महिला-लहान मुले एका पांघरुणाच्या साह्याने रस्त्यावर रात्र काढताना पाहून थक्क झालाे. काही लाेक ट्रॅक्टरच्या छाेट्या आसनावर झाेपलेले हाेते. काही ट्राॅलीच्या खाली अंथरूण टाकून झाेपण्याचा प्रयत्न करत हाेते. एका ट्राॅलीच्या खाली मुक्काम करत असलेले शेतकरी हरपालसिंह झाेपण्याचा प्रयत्न करत हाेते. परंतु त्यांना झाेप येत नव्हती. थंडीमुळे झाेप येत नाही का, असा विचारले. “सरकारशी टक्कर दिली. मग थंडीचे काय वाटणार? घरी पत्नी आजारी आहे आणि तिला आैषध देण्यासाठी जवळ काेणीही नाही. तिला फाेन करून घरी येऊ का, असे विचारले. परंतु माझा मृत्यू झाला तरी चालेल. परंतु विजयी झाल्याशिवाय येऊ नका,’ असे तिचे उत्तर असल्याचे त्यांनी सांगितले. काही अंतरावर शेतकऱ्यांचा एक गट शेकाेटीजवळ हाेता. ट्राॅलीमध्ये माणसे जास्त आहेत. म्हणून अर्धी रात्र काही लाेक झाेपून काढतात. त्यानंतर दुसऱ्याचा नंबर लागताे, असे या शेतकऱ्यांनी सांगितले.

शेतकऱ्याचा भावुक स्वर : एके ठिकाणी फाेनवरून घरच्या लाेकांशी बाेलणाऱ्या शेतकऱ्याचा भावुक स्वर कानी पडला. फाेनवरील संभाषण झाल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली. सायंकाळपर्यंत घरून १० वेळा फाेन आला. आंदाेलनस्थळी एखाद्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच कुटुंबीय काळजीत पडते. कारण मला आधी ह्रदयविकाराचा झटका आला हाेता. आैषधे संपली आहेत.

आंदाेलनस्थळी आतापर्यंत तीन जणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांच्याशी बाेलताना आतून एक आवाज येत हाेता. तेथे पाहिले तेव्हा दाेन तरुण व्हीलचेअरवर बसलेले हाेते. ते झाेपण्याची तयारी करत हाेते. आमचे पाय आता काम करत नाहीत. परंतु पुढील पिढ्यांसाठी सरकारसाेबत चर्चा करण्याची आमच्यात हिंमत आहे. ते दिवसभर व्हीलचेअरवर भटकंती करून गीतांद्वारे जाेश भरण्याचा प्रयत्न करतात. ट्राॅलीमध्ये रात्री काढावी लागतेय. मंचापासून एक किलाेमीटर अंतर चालून गेल्यानंतर एका पेट्राेल पंपाच्या बाहेर उघड्यावर काही लाेक थंड पाण्याने स्नान करत हाेते. त्याबद्दल िवचारले तेव्हा सरकारविराेधातील संतापापुढे पाण्याचा गारठा काय करणार, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. तेथेच स्वच्छतागृहाबाहेर रांग लागलेली हाेती. शेतकरी म्हणाले, प्रशासनाने नाममात्र म्हणून शाैचालयाची व्यवस्था केली. येथे पाण्याची साेय नाही. स्वच्छताही नाही. म्हणून दुकानांतील शाैचालयात जावे लागते.

आंदोलनाच्या मंचावरून संत रामसिंह यांना दिवसभर श्रद्धांजली
आंदाेलनस्थळी रात्रभर भटकंती केल्यानंतर आणखी एक गाेष्ट दिसून आली. एवढी थंडी व त्रास असतानाही काही लाेक रस्त्यावर साफसफाई करत हाेते. काही लाेक रात्रभर रखवालदारी करताना दिसले. संताच्या आत्महत्येच्या घटनेनंतर निगराणी आणखी वाढवण्यात आली हाेती. गुरुवारी दिवसभर वातावरण तापलेले हाेते. मंचावरून संत रामसिंह यांना दिवसभर श्रद्धांजली वाहिली जात हाेती.

बातम्या आणखी आहेत...