आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा निवडणूक 2021:भाजपच्या मागावर शेतकरी आंदोलन बंगालमध्ये दाखल

कोलकाताएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बंगालच्या भवानीपोरा, नंदीग्राममध्ये झाली शेतकऱ्यांची महापंचायत, भाजपला आव्हान

पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपच्या मागे-मागे आता शेतकरी आंदोलनही तेथे पोहोचले आहे. शनिवारी भवानीपोरा व नंदीग्राममध्ये शेतकऱ्यांची महापंचायत झाली. शेतकरी नेते राकेश टिकैत व योगेंद्र यादव यांच्यासह अनेक शेतकरी नेते या महापंचायतमध्ये सहभागी झाले. भवानीपोराच्या महापंचायतमध्ये टिकैत म्हणाले, तुम्ही कोणत्याही पक्षाला मतदान करा. परंतु भाजपला मत देऊ नका. संपूर्ण सरकार दिल्ली सोडून बंगालमध्ये प्रचारात दंग आहे. म्हणूनच आमचेही सगळे नेते येथे दाखल झाले. सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करत नाही. आम्ही आंदोलन आणखी ८ महिने चालवण्यास तयार आहोत. कृषी कायदा मागे घेतला जात नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवू. पंतप्रधान नरेंद्र मोदी जातील तेथे त्यांचा पाठलाग करत राहू, असे नेत्यांनी सांगितले. संयुक्त किसान मोर्चाचे नेते याेगेंद्र यादव म्हणाले, आम्ही कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाहीत. त्याचबरोबर विशेष पक्षाला मतदान करा, असेही म्हणत नाहीत. आम्हाला केवळ भाजपला धडा शिकवण्याची इच्छा आहे. सरकारच्या कानापर्यंत आमचे म्हणणे पोहोचवायचे आहे. त्यासाठी आगामी निवडणुकीत त्यांचे नुकसान होणे आवश्यक आहे.

डीएमकेचा जाहीरनामा जारी; ७५ टक्के नोकऱ्या स्थानिकांना
तामिळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष डीएमकेने शनिवारी आपला जाहीरनामा जारी केला. जाहीरनाम्यात ७५ टक्के नोकऱ्या राज्यातील लोकांना देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना डेटा कार्डसह मोफत संगणक टॅब्लेट देण्याचाही मुद्दा समाविष्ट आहे. पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. नीटवर बंदी घालण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. एआयएडीएमकेच्या गोल्ड लोन माफीमुळे दबावाखाली आलेल्या डीएमकेने आता भूमिपुत्रांचा मुद्दा काढला आहे. पक्षाने महिलांना १ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.

दोन दिवसांच्या दौऱ्यावर शहा बंगाल, आसाममध्ये
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी दोनदिवसीय दौऱ्यावर आसाम व पश्चिम बंगालला जातील. शहा रविवारी आसाममध्ये दोन जाहीर सभा घेतील. रविवारी सायंकाळी ते पश्चिम बंगालमधील खडगपूरमध्ये रोड शो करतील.
- काँग्रेसने आसाम निवडणुकीसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जारी केली आहे. पश्चिम बंगालप्रमाणेच यादीत रगुलाम नबी आझाद, पक्षाचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल, मनीष तिवारी, आनंद शर्मा यांची नावे समाविष्ट आहेत.

बातम्या आणखी आहेत...