आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Farmers Agition Updates: A Group Of Farmers In Kundli; Close The Anchor, Now Start Your Own Meal And Your Own Expenses; News And Live Updates

शेतकरी आंदोलनाचा 7 वा महिना:कुंडलीमध्ये शेतकऱ्यांचा ताफा; लंगर बंद, आता स्वत:चे जेवण आणि स्वत:चा खर्च सुरू

सोनिपतएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हरियाणा-दिल्लीच्या सिंधू, कुंडली, टिकरी, राजस्थानलगत खेडा सीमा, पंजाब-उ. प्रदेशातील

कडाक्याची थंडी, उष्णता, वादळ, पाऊस आणि कोरोना सोसणाऱ्या शेतकरी आंदोलनाने आता ७ व्या महिन्यात प्रवेश केला आहे. यादरम्यान कालानुरूप आंदोलनातही बदल झाला आहे. कुंडली सीमेपासून केजीपीपर्यंत १० किमी क्षेत्र आंदोलन स्थळ आहे. संयुक्त शेतकरी मोर्चा येथील कार्यालयात धोरण आखतो. आंदोलनात पुन्हा जोश भरण्यासाठी शेतकरी नेते ताफा घेऊन येत आहेत. अनेक दिवसांआधी घोषणा करून तारीख निश्चित केली जाते. नंतर विविध भाग व जिल्ह्याची ठिकाणे निश्चित केली जातात. शेतकरी नेते गुरनाम चढनी यांनी करनाल आणि अंबालाहून दोन ताफे आणले आहेत. दहिया खापच्या गावातील शेतकरी नेते अभिमन्यू कुहाड यांच्या नेतृत्वाखाली एक ताफा सिंघू सीमेवर गेला. गेल्या एका आठवड्यात ३ ताफे कुंडलीत पोहोचले आहेत. कुंडली सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी.

उत्तर प्रदेश : शेतकरी आंदोलन तीव्र होऊ शकते
लखनऊ | उत्तर प्रदेशात संसर्ग कमी झाल्यानंतर शेतकरी आंदोलन पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षही पुढे येत आहेत. राकेश टिकैत व राष्ट्रीय लोकदलाच्या प्रभाव क्षेत्रात शेतकरी जमा होत आहेत.

पंजाब : उत्तराखंड, यूपीत भाजपविरुद्ध उतरू
संगरूर | भाकियूचे जोगिंदरसिंह उगराहा म्हणाले, जोवर केंद्र सरकार कृषी कयदे रद्द करत नाही, आंदोलन सुरूच राहील. उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात भाजप सरकारविरुद्ध प्रचार केला जाईल. मुजफ्फरनगरमध्ये महामोर्चा काढून यूपी मिशन सुरू केले जाईल.

टिकरी : आधी २५ हजार, आता ३ हजार
बहादूरगड | टिकरी सीमेवर शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. येथे सुमारे २५ हजार शेतकरी होते, आता केवळ ३ हजार आहेत. महिलांची संख्याही घटली आहे. मात्र, शेतकरी उत्साह दाखवत आहेत. मात्र, काही वेळ बोलल्यानंतर निराशा दिसते. औद्योगिक क्षेत्रात आंदोलन झाल्यामुळे ९०% कारखाने बंद आहेत. ३०% कायमस्वरूपी बंद झाले आहेत.

खेडा सीमा : ४५ तंबू, १५० लोकांकडे आंदोलनाचा झेंडा रेवाडी | कुंडली-सिंघू सीमेनंतर १३ डिसेंबर २०२० रोजी दिल्ली-जयपूर महामार्गावरील खेडा-शाहजहांपूर सीमेवर शेतकऱ्यांचा डेरा पडला आहे. मात्र, उन्हाळ्यात आंदोलन थंड पडले आहे. सुमारे ४५ तंबू आणि १००-१५० आंदोलकच शिल्लक आहेत. सुरुवातीपासून चिकटून असलेले व सीकरचे ४ वेळा आमदार राहिलेले अमराराम व श्रीगंगानगरचे माजी आमदार पवन दुग्गल आंदोलन व्यर्थ होत आहे, या मताशी सहमत नाहीत. देशाची ६५% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. २०२४ पर्यंत बसावे लागले तरी येथे बसू.

सिंघू-कुंडली : मंचावर दररोज हालचाल, नेते येतात-जातात
सिंघू आणि कुंडली सीमेवर आंदोलनाचा मुख्य मंच आहे. येथे २६ नोव्हेंबरला ट्रॅक्टर-ट्रॉली उभी करून माइकवरील भाषणासह आंदाेलन सुरू झाले आहे. याच्या पुढे दिल्लीची सीमा आहे. तिथे पोलिसांनी तारकुंपण, सिमेंट बॅरिकेड्स लावले आहेत. आता लंगर सेवा राहिली नाही. सर्वांना स्वत:चे जेवण आणि खर्च उचलावा लागतो. शेतकरी स्वत: खर्च करत आहेत. गाव व खापच्या हिशेबाने झोपडी, मंडप आणि स्वयंपाकाची सोय केली आहे. चक्रीय स्थितीनुसार, शेतकरी पोहोचत आहेत. गव्हाच्या हंगामानंतर गावांतून शेतकरी धान्य पोहोचवले. गिरणीही लावली आहे.

५२% जिल्ह्यांत शेतकऱ्यांपेक्षा जास्त मजूर, ४ वर्षांत पाचपट वाढले शेतकऱ्यांचे आंदोलन
अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली - देशाच्या ५२ टक्के जिल्ह्यांमध्ये शेतमजुरांची संख्या शेतकऱ्यांपेक्षा जास्त झाली आहे. सरकारने २०१७ मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले. मात्र, ४ वर्षांत शेतकऱ्यांचे आंदोलन पाचपट वाढले आहे. “सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट’ अहवालात ही आकडेवारी समोर आली. त्यानुसार, बिहार, केरळ व पुद्दुचेरीच्या सर्व जिल्ह्यांत शेतकऱ्यांच्या तुलनेत शेतमजूर जास्त आहेत. मध्य प्रदेशात १३ जिल्ह्यांत शेतकरी आणि ३७ जिल्ह्यांत शेतमजूर जास्त असल्याचे दिसून आले आहे.ही संख्या महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र व तेलंगणात सर्वाधिक आहे. २०१७ मध्ये केंद्रा सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, तेव्हा १५ राज्यांत ३४ शेतकरी आंदोलक होते. वर्ष २०२०-२१ पर्यंत २२ राज्यांमध्ये १६५ शेतकऱ्यांची आंदोलने झाली. त्यापैकी ९६ सरकारच्या आर्थिक आणि शेती धोरणाविरुद्ध झाली आहेत.

बातम्या आणखी आहेत...