आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंदोलनाचा आज 19वा दिवस:शेतकऱ्यांनी दिल्ली-जयपूर हायवे केला जाम, आज उपोषण; पुन्हा होऊ शकते चर्चेला सुरुवात

नवी दिल्ली/कुंडली सीमाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गृहमंत्री अमित शहा सक्रिय, पंजाबातील शेतकरी नेत्यांची स्वत: समजूत काढणार

तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी रविवारी दिल्ली- जयपूर हायवे जाम केला. जयपूरहून शेतकऱ्यांनी कूच केल्याचे वृत्त येताच हरियाणात रेवाडीत कलम १४४ लागू करण्यात आले. तरीही शेतकऱ्यांनी दिल्ली-जयपूर हायवे जाम केला. हरियाणा- राजस्थानच्या शाहजहापूर सीमेवरही जाम होता. लवकरच शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चा होण्याचे वृत्त आहे. त्या आधीच शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र केले आहे. शेतकरी आता सोमवारी देशातील सर्व जिल्हा मुख्यालयात धरणे देतील, तसेच सर्व सीमांवर सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपोषण करतील. निदर्शनांमुळे रेल्वेने अजमेर- अमृतसर व डिब्रुगड- अमृतसर एक्स्प्रेस (अप/डाउन) रद्द केली.

तसेच अमृतसरहून महाराष्ट्रात जाणाऱ्या ६ रेल्वे अंशत: रद्द केल्या आहेत. दरम्यान, आंदोलनाबाबत कुंडली सीमेवर शेतकरी संघटनांच्या नेत्यांची बैठक झाली. आतापर्यंत ४० शेतकरी नेते सरकारशी चर्चा करायला जात हाेते. आता शिष्टमंडळ लहान करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. शेतकरी नेते शिवकुमार कक्का यांनी सांगितले की, आमरण उपोषणाऐवजी केवळ एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणाचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सरकार पाच दुरुस्त्यांवर विश्वास देत असले तरी आम्हाला कायदा रद्द करायचा आहे. गाझीपूर सीमेवर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यायला जामियाचे काही विद्यार्थी डफ-पोस्टर घेऊन आले. मात्र, शेतकऱ्यांनी त्यांना पळवून लावले. शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी सांगितले की, चुकीचे घटक आमच्यात घुसू नयेत म्हणून लक्ष द्यावे लागेल. सरकारला चर्चा करायची असेल तर आम्ही एक समिती स्थापन करून निर्णय घेऊ. दिल्लीत गृहमंत्री अमित शहांनी कृषिमंत्री तोमरांंशी चर्चा करत शेतकऱ्यांसोबत होणाऱ्या चर्चेचा आढावा घेतला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आप कार्यकर्ते उपोषण करतील असे सांगितले.

भास्कर इनसाइट : गृहमंत्री अमित शहा सक्रिय, पंजाबातील शेतकरी नेत्यांची स्वत: समजूत काढणार
शेतकरी आंदोलनाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सक्रिय झाले आहेत. आतापर्यंत शहांची शेतकऱ्यांसोबत एकच बैठक झाली आहे. मात्र, आता प्रत्येक मुद्द्यात ते स्वत: लक्ष घालत आहेत. याबाबत मागील दोन दिवसांपासून शहांनी दिवसाला ५ पेक्षा जास्त बैठका घेतल्या आहेत. सरकारकडून प्रत्येक राज्यातील शेतकऱ्यांसाठी वेगळी रणनीती आखली जात आहे. शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांवर वेगवेगळ्या राज्यांची आणि युनियनची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, पंजाबातील शेतकरी नेत्यांसोबत अमित शहा स्वत: चर्चा करणार आहेत. यासाठी त्यांनी दोन योजनांवर काम सुरू केले आहे. पहिली, सीमेवर सुरक्षा व्यवस्था वाढवली जात आहे. दुसरी, युनियनला वेगवेगळ्या गटांत विभागले जात आहे. पंजाबातील शेतकरी नेत्यांची समजूत कशाप्रकारे काढावी यासाठी शहांनी रविवारी त्यांच्या निवासस्थानी कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय राज्यमंत्री सोम प्रकाश, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, अश्विनी शर्मांसह पंजाबातील अनेक नेत्यांची भेट घेतली. पंजाबातील नेत्यांना तेथील स्थानिक स्थितीचे अपडेट देण्यास सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी शनिवारी रात्री राजनाथ सिंह यांनी चिल्ला सीमेवर शेतकरी नेत्यांची भेट घेतली होती. यानंतर सीमा खुली करण्यात आली होती.

दुसरीकडे, नरेंद्रसिंह तोमर यांनी हरियाणातील काही शेतकरी संघटनांची भेट घेऊन त्यांचे मन वळवले आहे. रविवारी तोमर यांनी उत्तराखंडातील शेतकऱ्यांची भेट घेतली. विशेष म्हणजे या भेटीनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन संपवत कायद्यांना पाठिंबा दिला. राजनाथ सिंह यांनी शेतकरी नेते व्ही.एम.सिंग यांच्याशी चर्चा करून एमएसएपी व सुधारणांबाबत ग्वाही दिली आहे. यानंतर व्हीएमही सहमत झाले. शहांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतही चर्चा केली आहे. ते शेतकऱ्यांना लवकरच चर्चेसाठी बोलावू शकतात. चर्चेसाठी छोटी समिती नेमावी, असा संदेश शेतकरी नेत्यांना पाठवण्यात आला आहे. शहांना भेटल्यानंतर केंद्रीय व्यापार राज्यमंत्री सोम प्रकाश म्हणाले, शेतकरी युनियनच्या नेत्यांनी हट्ट सोडला नाही तर या नेत्यांचे संघटनेवरील नियंत्रणही जाऊ शकते आणि दुसरे नेते पुढे येतील.

कुंडली सीमेवर शेतकऱ्यांच्या बैठकीत ४ मोठे निर्णय
- हरियाणातील शेतकरी नेते गुरनामसिंग चढून म्हणाले, भारतीय किसान युनियनचा (भानू) संयुक्त मोर्चासोबत कुठलाही संबंध नाही. ते सरकारला मिळालेले आहेत. मागण्या पूर्ण होईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील.
- शेतकरी संघटनांचे प्रमुख सोमवारी सकाळी ८ वाजेपासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी व प्रांत कार्यालयाबाहेर व राज्याच्या सीमेवर उपोषण करणार.
- राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे संयोजक व्ही. एम. सिंग यांना पदमुक्त करण्यात आले आहे. इतर संघटना करो अथवा न करो, आम्ही सरकारशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.
- शेतकरी नेते म्हणाले, आंदोलनाबाबत कुंडली सीमेवरून होणारे निर्णयच अंतिम मानले जातील.

... बिहारमध्ये कायद्याच्या समर्थनार्थ भाजपने पहिली चावडी बैठक घेतली
- यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ म्हणाले, भारताच्या अखंडतेला आव्हान दिले जात आहे. हे अमान्य आहे.
- पंजाबचे डीआयजी (जेल) लखमिंदरसिंग जाखड यांचा शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राजीनामा.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser