आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Farmer's Chakka Jam: Home Minister Amit Shah Postponed Sindhudurg Visit, Was To Attend The Function Of Narayan Rane's Medical College

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन:गृहमंत्री अमित शहांचा सिंधुदुर्ग दौरा पुढे ढकलला, नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजच्या समारंभात होणार होते सहभागी

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रातील शेतकरीही करणार आंदोलन

कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत असलेले शेतकरी आज तीन राज्य वगळता देशभरात चक्काजाम आंदोलन करणार आहेत. शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन लक्षात घेता केंद्रीय गृहमंत्री अमित देशमुख यांनी आपला सिंधुदुर्ग दौरा पुढे ढकलला आहे. शाह पहिल्यांदा सिंधुदुर्गात येत होते आणि येथे एका खासगी मेडिकल कॉलेजच्या समारंभात ते सामिल होणार होते. आता ते 7 फेब्रुवारी म्हणजेच रविवारी या दौऱ्यावर येतील.

अमित शहा हे नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटन सोहळ्याला येणार होते. लाइफटाइम मेडिकल कॉलेज व रुग्णालयाच्या डीन यांनीही अमित शहा यांचा दौरा पुढे ढकलल्याची पुष्टी केली होती. याआधीही शेतकरी आंदोलनामुळे अमित शहा यांना कोकण दौरा रद्द करावा लागला होता.

अनेक मोठे भाजप नेते होणार सामिल
या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर देखील सामिल होतील.

महाराष्ट्रातील शेतकरीही करणार आंदोलन
कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत असलेले शेतकरी 6 फेब्रुवारीला देशभरात चक्काजाम आंदोलन करणार आहेत. दुपारी 12 ते 3 या वेळेत हे आंदोलन सुरू असणार आहे. महाराष्ट्रातही मुंबईसह अनेक शहरांमध्ये हे आंदोलन केले जाणार आहे.