आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
तीन कृषी कायद्यांविरोधात प्रजासत्ताकदिनी राजधानी नवी दिल्लीत शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड होणार आहे. दिल्लीच्या सीमेवर ठिय्या आंदोलनास २६ जानेवारी रोजी ६२ दिवस पूर्ण होणार असून सरकारवर दबाव टाकून शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेडला परवानगी मिळवली आहे. दरम्यान, आता १ फेब्रुवारी रोजी संसदेला घेराव घालण्याची घोषणा शेतकरी संघटनांनी केली असून त्यामुळे केंद्र सरकारसमोरील डोकेदुखी आणखी वाढणार आहे.
संसदेत अर्थसंकल्प सादर होईल त्या दिवशी म्हणजे विविध ठिकाणांहून शेतकरी पदयात्रेने संसदेकडे कूच करणार असून त्यानंतर संसद भवनाला घेराव घालण्यात येईल, असे शेतकरी नेते दर्शन पाल यांनी सांगितले. दरम्यान, मंगळवारी लष्कराच्या संचलनानंतर ट्रॅक्टर परेड काढण्यात येणार आहे. देशभरातून आलेले ४० संघटनांचे सुमारे ६ लाख शेतकरी या परेडमध्ये सहभागी होणार आहेत. परेडसाठी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थानातून शेतकरी स्वत:चे ट्रॅक्टर घेऊन पोहोचणार आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.