आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Farmers' Delhi Chalo Movement; CRPF Police Battalion Deployed On Delhi Haryana Border

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी आंदोलन:कृषी कायद्याविरोधात बळीराजा आक्रमक; बॅरिकेडींग तोडण्यासह पोलिसांवर दगडफेक, आंदोलकांवर वॉटर कॅननसह अश्रूधुराचा वापर

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना काळात शेतकरी दिल्लीत आल्यावर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल- दिल्ली पोलिस

कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी 26 ते 28 नोव्हेंबरपर्यंत 'दिल्ली चलो आंदोलन' पुकारले आहे. पंजाब आणि हरियाणाातील शेतकरी मागील दोन महिन्यांपासून रस्त्यावर आहेत, पण आता त्यांचे 'दिल्ली चलो आंदोलन 'सुरू झाले आहे. दिल्लीला जाण्यासाठी पंजाबच्या शेतकऱ्यांना हरियाणामधून जावे लागेल. तिकडे, हरियाणा सरकारने म्हटले आहे की, कोणत्याही किमतीत शेतकऱ्यांना हरियाणामध्ये येऊन वातावरण खराब करू दिले जाणार नाही. यासाठी दिल्ली-चंडीगड हायवे ब्लॉक करण्यात आला असून, जागोजागी पोलिसांचा मोठा फोज फाटा तैनात करण्यात आला आहे.

आदोंलनादरम्यान अनेक ठिकाणी पोलिस आणि शेतकऱ्यांची बाचाबाची झाली. शेतकऱ्यांची बॅरिकेडची तोडफोड केली. यामुळे हरियाणा पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी वाटर कॅननचा वापर केला. तिकडे, दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, कोरोना काळात शेतकरी दिल्लीत आल्यावर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट केले की, ‘केंद्र सरकारचे तिन्ही कायदे शेतकऱ्यांविरोधात आहेत. हे बिल परत घेण्याऐवजी शेतकऱ्यांना शांतीपूर्ण आंदोलन करण्यापासून रोखले जात आहे, त्यांच्यावर वॉटर कॅनन चालवली जात आहे. शांतिपूर्ण प्रदर्शन त्यांचा अधिकार आहे.’

एक लाख शेतकरी येण्याचा दावा

कृषी कायद्याविरोधात पंजाबचे हजारे शेतकऱ्यांनी हरियाणा सीमेत प्रवेश केला. यानंतर, हरियाणा सरकारने पंजाब बॉर्डर सील केली आहे. शेतककरी संघटनांनी सीमेवर एक लाख शेतकरी येतील, असा दावा केला आहे. दरम्यान, बुधवारी चंडीगड-दिल्ली हायवेवर 15 किलोमीटर लांब चक्काजाम झाला. अंबाला हायवेवर एकत्र आलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलाला त्यांच्यावर वॉटरगनचा वापर करावा लागला. यादरम्यान, नाराज शेतकऱ्यांनी पोलिसांच्या बॅरिकेडची तोडफोड केली. यानंतर कलम 144 लागून करुन जवळपास 100 शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. यादरम्यान, शेतकरी म्हणाले की, आम्हाला थांबवल्यास दिल्ली हायवे बंद करू. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने आंदोलन सुरू असेपर्यंत राज्यातील कोणतीच बस पंजाबला जाणार नसल्याचा निर्णय घेतला.

नॅशनल हायवे-52 दगड, बॅरिकेड आणि टोकदार तारांनी बंद

हरियाणा सरकारने जींदला लागून असलेल्या नॅशनल हायवे-52ला सील केले आहे. रस्त्यावर 5 फुट उंच दकड आणि टोकदार तारांनी बॅरिकेडींग केली आहे. हरियाणाचे डीआयजी ओपी नरवाल यांनी सांगितले की, पंजाब-हरियाणाला जोडणाऱ्या सर्व आठ रस्त्यांना सील करण्यात आले आहे. यासोबतच 2 हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser