आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सिंघू आणि टिकारी सीमेवर 18 दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकर्यांचे आरोग्य मोठे आव्हान बनले आहे. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात अँटीबायोटिक आणि पेन किलर गोळ्या घेत आहेत. भीतीचे कारण म्हणजे, या गोळ्या देताना त्या व्यक्तीची मेडिकल हिस्ट्री आणि इतर काळजी घेतली जात नाहीये. डॉक्टरांच्या म्हनण्यानुसार, ज्यास्त अँटीबायोटिक गोळ्यांचे सेवन केल्याने ह्रदयविकाराचा धोका आहे. आतापर्यंत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांपैकी बहादुरगडमध्ये 5 आणि सोनीपतमध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तसेच, 25 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना आजारी पडल्यानंतर रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
कुंडली आणि टिकरी बॉर्डरवर हरियाणाच्या आरोग्य विभागाची 20 पथके तैनात आहेत. याशिवाय पंजाब-हरियाणावरुन आलेली आयुष, होम्योपॅथी डॉक्टर, फार्मासिस्ट आणि सेवा म्हणून औषधे वाटणाऱ्यांची 30 पेक्षा जास्त टीम्स आहेत. फक्त सरकारी पथकांनी 65 हजारांपेक्षा जास्त लोकांची तपासणी केली आहे.
पंजाबच्या नवांशहरमधून शनिवारी कुंडलीला आलेल्या डॉ. टेकचंद सैनी आणि डॉ. विमल कुमार यांनी सांगितले की, इथे आल्यावर त्यांना समजले की, आंदोलनातील शेतकरी आजारी पडत आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत एक-एक स्ट्रीप गोळ्या खाल्या आहेत. याचा त्यांच्या आरोग्यावर परीणाम पडू शकतो.
मेडिकल टीम करणार मॉनिटरिंग: CMO
सोनीपतचे सीएमओ डॉ. जेएस पुनिया यांचे म्हणने आहे की, कुंडलीमध्ये शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी आरोग्य विभागाने 10 डॉक्टरांची, 2 नर्सिंग स्टाफची आणि 5 सँपलिंगची टीम तयार केली आहे. आम्ही सर्वांकडे लक्ष देत आहोत. चुकीची औषधे जाऊ नये, याची प्रामुख्याने मॉनिटरींग केली जात आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.