आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Farmers Hold March Delhi Haryana Border, Demanded Compensation For The Farmers Killed During The Agitation

दिल्ली-हरियाणा सीमेवर पुन्हा जमले शेतकरी:आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची मागणी

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली-हरियाणा सीमेजवळ पुन्हा एकदा शेतकऱ्यांची पंचायत होत आहे. यात हरियाणा, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी आहेत. आंदोलन स्थगित होऊन आज एक वर्ष पूर्ण झाले. आंदोलक शेतकरी 11 डिसेंबर 2021 रोजी दिल्लीच्या सीमेवरून घरी परतले होते.

आज किसान पंचायत सोनीपतच्या राजीव गांधी एज्युकेशन सिटीच्या मुख्य गेटवर होत आहे. या पंचायतीमध्ये एमएसपी हमीभाव, आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना भरपाई आणि कुटुंबाला सरकारी नोकरी देण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी लंगरची व्यवस्था करण्यात आली आहे.

डझनभर बस, ट्रॅक्टर आणि कारच्या ताफ्यासह शेतकरी दाखल झाले आहेत. त्यामुळे रस्त्यावर जामची परिस्थिती निश्चितच असली तरी वाहनांची ये-जा सुरू आहे. मागणी मान्य न केल्याने 2023 मध्ये पुन्हा आंदोलन सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. त्याबाबतही पंचायतीमध्ये रणनीती आखली जाणार आहे.

केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर मागील वर्षी संसदेत तीन कृषी कायदे लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर केंद्र सरकारच्या विरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात एल्गार पुकारला होता. दिल्लीतील सीमांवर शेतकरी आंदोलन करत होते. त्यात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतले असून, आता मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.

शेतकरी आंदोलनाची 378 दिवसांनी सांगता झाली होती

11 डिसेंबर 2021 तिन्ही कृषी कायद्यांविरुद्ध सुरू झालेले शेतकरी आंदोलन संपले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या 5 मागण्यांवर पाठवलेल्या प्रस्तावाला संयुक्त किसान मोर्चाने सहमती दर्शवली. विजय दिन साजरा करत शेतकऱ्यांनी सर्व टोल नाके, बॉर्डर रिकाम्या केल्या जातील. 13 महिन्यांपर्यंत शेतकरी ठाम राहिले. तिन्ही कायदे रद्द करूनच ते परतले.

बातम्या आणखी आहेत...