आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिल्लीत १४ दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदाेलनाच्या आक्राेशाची मुळे २११ वर्षे जुनी आहेत... पुरावा म्हणजे इंग्रजांच्या काळातील ते दस्तएेवज, ज्यात म्हटले आहे की, शेतकऱ्यांवर केलेला देशातील पहिला अभ्यास १८७९ मध्ये समाेर आला. तत्कालीन व्हाइसराॅय लाॅर्ड मेयाे यांच्या आदेशानुसार ए.आे. ह्यूम यांनी तयार केलेल्या त्या अहवालामध्ये असे म्हटले आहे की, शेतकरी गेल्या ७० वर्षांपासून त्यांच्या पिकांच्या योग्य भावासाठी झगडत आहेत. असा निष्कर्ष काढला गेला की, शेतकऱ्यांचे निम्मेे उत्पादन दलाल, सरकारी लोक आणि बडे जमीनदार घेतात. शेतकऱ्यांना केवळ सहावा वाटा मिळतो. तेव्हापासून आतापर्यंत देशात ४१ व्हाइसराॅय, १४ पंतप्रधान आणि १७ सरकारे बदलली, परंतु परिस्थिती आहे तशीच आहे. जी समस्या २११ वर्षांत दूर हाेऊ शकली नाही ती १५ दिवसांच्या आंदाेलनाने कशी सुटणार हा माेठा प्रश्न आहे. पहिल्या अहवालामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात काय काय म्हटले हाेते ते जाणून घ्या....
ते ३ उपाय... जे त्या वेळी सुचवले हाेते, आजही जैसे थे
1. अधिकाऱ्यांनी राेज १० तास शेतकऱ्यांना द्यावे
विभागाच्या सक्षम सल्लागारांनी शेतकऱ्यांमध्ये राहून समस्या साेडवाव्यात. त्यांना रोज दहा तास द्या. एका क्षेत्रात १० वर्षे राहा. कृषी काॅलेज उघडा. शेतकऱ्यांनी वैज्ञानिकांकडून व वैज्ञानिकांनी शेतकऱ्यांकडून शिकावे.
2. शेतकऱ्यांना कला, विज्ञान, उद्योगाशी जाेडा
शेतकऱ्यांना उद्याेग, विज्ञान व कलेशी जाेडा. युराेप, अमेरिका, आॅस्ट्रेलियात त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन भरवा. शेतीला उद्याेगाशी जाेडा. त्यांना राेज हवामानाची माहिती द्या. गावागावात जैविक बगिचे तयार करा.
3. महाविद्यालयांपेक्षा कृषी संस्था उघडाव्यात
विधी,शैक्षणिक काॅलेजपेक्षा शेतकऱ्यांना मदत करू शकणाऱ्या कृषी संस्थांची जास्त गरज आहे.शाळेत कृषी, बाॅटनी, कृषी रसायन व्हेजिटेबल फिजिओलॉजी,जिआॅलाॅजी शिकवा. प्रॅक्टिकल ज्ञान द्या.
त्या ३ शक्ती... शेतकऱ्यांकडे तेव्हा हाेत्या, आजही आहेत
1. या देशाचा शेतकरी जगात जास्त अनुभवी
शेतीचा तीन हजार वर्षांचा अनुभव असलेल्या या शेतकऱ्यांसमाेर इंग्लंडचे शेतकरी काहीही नाही. पंजाब, हरियाणामध्ये एकेकाळी काही पिकत नव्हते. पण आता येथे शेतांची हिरवळ आहे.
2. वादळ-वाऱ्यांचा त्यांना अचूक अंदाज
हवामानाचे असे ज्ञान की वादळ, गारपिटीचीही त्यांना माहिती आहे. काेणते पीक किती काळ घ्यायचे, पीक कसे घ्यायचे याबद्दल आश्चर्यकारक त्यांना महिती. ग्रह-ताऱ्यांचीदेखील माहिती त्यांना असते.
3. पीक कधी, कसे घ्यावे यात ते महारथी
देशातल्या शेतकऱ्यांना काेणते पीक कधी, कसे घ्यायचे, पेरणी कशी ,किती करायची या सगळ्यात ते महारथी आहेत. धान्य साठवणुकीत हुशार आहेत. पशुवैद्यकीय उपचारातही ते कुशल आहेत.
लॉर्ड मेयो यांना सादर केलेल्या अहवालात ह्यूमने लिहिलेलेे आजही प्रासंगिक
ह्यूमने हा अहवाल १ जुलै १८७९ राेजी व्हाइसराॅय लाॅर्ड मेयाे यांच्याकडे सादर केला. यात भारतीय शेतकऱ्यांचे काैतुक करताना लिहिले की, ‘ शेतकरी ७० वर्षांपासून एकाच समस्येला तोंड देत असून त्यावर उपाय न निघणे ही किती लाजिरवाणी गाेष्ट आहे. आपण त्यांचा सर्वनाश हाेऊ देऊ का? आपल्या आर्थिक धमन्या कशा उद्ध्वस्त हाेऊ देऊ? आपल्या डाेळ्यासमाेर सोन्याचे अंडे देणाऱ्या हंसाला मरताना कसे पाहवणार? ’ ह्यूमच्या मते, मेयो हा एकमेव व्हाइसराॅय होता, ताे स्वतः शेतकरी होता. म्हणूनच त्यांनी हा अभ्यास केला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.