आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Farmers Have The Right To Protest, But The Road Should Not Be Blocked Forever: Supreme Court

नवी दिल्ली:शेतकऱ्यांना आंदोलनाचा हक्क, मात्र रस्ता कायमच जाम नको : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी कायद्यांिवरुद्ध दिल्ली सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना सुप्रीम कोर्टाने पुन्हा स्पष्ट शब्दांत सल्ला दिला. कोर्ट म्हणाले, प्रकरण विचाराधीन असतानाही आंदोलनाचा हक्क आहे. तुम्ही आंदोलन करा, मात्र कायमस्वरूपी रस्ता जाम करू शकत नाहीत. कोर्टाने या प्रकरणात शेतकरी संघटनांना उत्तर देण्यासाठी अवधी देऊन सुनावणी ७ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली. जंतरमंतरवरील आंदोलन व रस्ता जाम होण्याबाबत दाखल याचिकांवर गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. न्या. संजय किशन कौल व एम. एम. सुंदरेश यांच्या पीठाने शेतकऱ्यांना सांगितले की, रस्ते स्वच्छ असले पाहिजेत. आम्ही वारंवार कायदा निश्चित करू शकत नाहीत. लोकांना रस्त्यांवर जाण्याचा अधिकार आहे, मात्र ते यात अडथळा आणू शकत नाहीत. काही ना काही उपाय निघाला पाहिजे. दुसरीकडे, शेतकऱ्यांच्या वतीने हजर ज्येष्ठ विधिज्ञ दुष्यंत दवे म्हणाले, रस्ते शेतकऱ्यांनी नव्हे, तर दिल्ली पोलिसांनी बंद केले आहेत. आम्हाला रामलीला मैदानावर जाण्याची परवानगी दिली जावी.

संयुक्त किसान मोर्चातून योगेंद्र यादव निलंबित
पानिपत | संयुक्त किसान मोर्चाने गुरुवारी आपल्या नऊ सदस्यांच्या प्रमुख समितीचे नेते योगेंद्र यादव यांना एक महिन्यासाठी निलंबित केले. लखीमपूर हिंसाचारात मारले गेलेले भाजपचे कार्यकर्ते शुभम मिश्रा यांच्या घरी गेल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...