आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबमध्ये गव्हाचे विक्रमी उत्पादन:शेतकऱ्यांचे सहा महिने धरणे, पत्नींनी केले श्रम,२६ हजार काेटींची कमाई

जालंधर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अाव्हान तरी केली विक्रमाची नाेंद, पत्नी अाणि मुलांनी केल्या पेरण्या

काेराेना संसर्गाच्या उद्रेकाच्या दरम्यानच गेल्या सहा महिन्यांपासून कृषी कायद्यांच्या विराेधात पंजाबचे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर अांदाेलन करत अाहेत. पण त्यांची पत्नी, मुले अाणि मुलींनी दुहेरी भूमिका बजावताना केवळ स्वयंपाकघरच सांभाळले नाही तर शेतात फावडे, कुदळ मारण्याबराेबरच ट्रॅक्टरही चालवला. पेरण्या, खत, फवारणीपासून ते कापणीदेखील स्वत:च केली. त्याचा परिणाम म्हणजे या वर्षी राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारी संस्थांना गहू विक्री करण्याचा अातापर्यंतचा विक्रम माेडला अाहे.

१३ मेपर्यंत १३२ लाख १६ हजार १८७ मेट्रिक टन गव्हाच्या पिकाची मंडईत विक्री झाली. इतकेच नाही तर शेतकऱ्यांनी २६ हजार काेटी रुपये कमावले असून ते मागील हंगामाच्या तुलनेत १४०० काेटी रुपयांपेक्षा जास्त अाहेत. विशेष म्हणजे पंजाब सरकारने १० एप्रिल ते १३ मे या ३४ दिवसांमध्ये १३० लाख मेट्रिक टन गहू खरेदीचे लक्ष्य ठेवले हाेते.

अाव्हान तरी केली विक्रमाची नाेंद
या वेळी हवामान खराब होते. उष्णता, वादळ, पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकरी गव्हाला पाणी देण्यास असमर्थ हाेते. तरीही गव्हाच्या खरेदीत पंजाबने सर्वाधिक विक्रम नोंदवला. मागील हंगामात १७७ मे.टन उत्पादन झाले होते. या वेळी १७१ लाख मेट्रिक टन झाला - गुरविंदरसिंग, सहसंचालक, कृषी विभाग

श्रम : पत्नी अाणि मुलांनी केल्या पेरण्या
गव्हाच्या पेरणीच्या वेळी राज्यातील सुमारे १६.५ लाख शेतकरी कुटुंबातील निम्मे सदस्य दिल्लीच्या सीमेवर अांदाेलन करत हाेते. त्यामुळे त्यांच्या पत्नींनी अाणि मुलांनी गव्हाच्या पेरण्या केल्या.

पेरणीच्या वेळी लाॅकडाऊन असल्याने बाहेरील राज्यांतून येणाऱ्या मालगाड्या बंद हाेत्या. त्यामुळे पंजाबमध्ये डॅप अाणि युरिया खताचा तुटवडा झाला. अनेक ठिकाणी गव्हाच्या पेरण्यांनाही विलंब झाला.

बातम्या आणखी आहेत...