आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Farmers Laws Repealed | Cabinet Approval | Narendra Modi Cabinet Approves Farm Laws Repeal Bill Today

कृषी कायदे रद्द:तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, पीएम मोदींनी 5 दिवसांपूर्वी केली होती घोषणा

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरात शेतकरी आंदोलनानंतर तिन्ही नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाच दिवसांपूर्वीच हे कायदे परत घेत असल्याची घोषणा केली होती. कॅबिनेटने मंजुरी दिल्यानंतर आता या कायद्यांना परत घेण्याचा प्रस्ताव संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडला जाणार आहे. यानंतर देशभर सुरू असलेले शेतकरी आंदोलन सुद्धा मिटतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी देशवासियांना संबोधित करताना तीन नवीन कृषी कायदे परत घेत असल्याची घोषणा केली. सरकारने हे कायदे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आणले होते. परंतु, याचे फायदे काही शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात यश आले नाही. येत्या संसदीय अधिवेशनात कायदे परत घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. तज्ज्ञांच्या मते, हिवाळी अधिवेशनात तीन दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. संसदेचे पुढील अधिवेशन 29 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.

असे परत घेतले जातील कृषी कायदे

17 सप्टेंबर 2020 रोजी तिन्ही कृषी कायद्यांना लोकसभेत मंजुरी मिळाली. राष्ट्रपतींनी त्यावर 27 सप्टेंबर रोजी शिक्कामोर्तब केला. तेव्हापासूनच शेतकरी संघटना पेटून उठल्या. घटनेचे जाणकार विराग गुप्ता यांनी सांगितल्याप्रमाणे, कुठलाही कायदा परत घेण्याची प्रक्रिया कायदा तयार करण्यासारखीच असते.

  • सर्वप्रथम सरकारकडून हा प्रस्ताव संसदेत मांडला जाईल.
  • संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये बहुमताच्या आधारे प्रस्तावाला मंजुरी मिळवली जाईल.
  • मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे जाईल. राष्ट्रपतींची स्वाक्षरी होईल.
  • राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर त्याचे सरकारी नोटिफिकेशन जारी केले जाईल.
  • नोटिफिकेशन जारी होताच कृषी कायदे रद्द होतील.
बातम्या आणखी आहेत...