आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Farmers Protest : After Modi's Appeal, The Farmers' Leaders Were Once Again Ready For Discussion

शेतकरी आंदोलनाचा 75 वा दिवस:मोदींच्या आवाहनानंतर शेतकरी नेते पुन्हा एकदा चर्चेसाठी तयार, म्हणाले - सरकारने तारीख निश्चित करावी

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • MSP कायम राहील - पंतप्रधानांनी दिला विश्वास, शेतकरी नेते टिकैत म्हणाले - देश विश्वासाने नाही तर कायद्याने चालतो

कृषी कायद्यांविरोधात 75 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांनी पुन्हा एकदा सरकारशी चर्चा करण्यास तयारी दर्शवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. सोमवारी राज्यसभेत बोलताना मोदींनी शेतकरी नेत्यांना निषेध संपवून चर्चेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. सुमारे 5 तासानंतर, संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य शिवकुमार कक्का म्हणाले की, पुढच्या फेरीच्या चर्चेसाठी ते तयार आहेत, सरकारने त्यांना बैठकीचा दिवस व वेळ सांगावा.

मोदींच्या 'आंदोलनजीवी' वक्तव्यावर आक्षेप

मोदी राज्यसभेत म्हणाले की, "या देशात मागील काही दिवसांपासून नवीन जमातीचा जन्म झाला आहे. एक नवीन समुदाय उदयास आला - आंदोलनजीवी. तुम्ही पाहू शकता की, प्रत्येक आंदोलनात ही जमान दिसते. ते आंदोलनाशिवाय जगू शकत नाहीत. आपण त्यांना ओळखायला हवे." या विधानावर शेतकरी नेत्यांनी आक्षेप व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांची सरकारसोबत 12 वेळा झालेली चर्चा निष्फळ ठरली होती

शेतकरी आणि सरकारमध्ये आतापर्यंत 12 वेळा चर्चा झाली आहे, मात्र अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. सरकारने हे तीनही कृषी कायदे मागे घ्यावेत यावर शेतकरी ठाम आहेत. त्याचबरोबर सरकार असे म्हणत आहे की ते कायद्यात बदल करण्यास तयार आहेत आणि जर शेतकऱ्यांना हवे असल्यास तिन्ही कायदे दीड वर्षासाठी स्थगित होऊ शकतात. शेतकरी आणि सरकारमध्ये शेवटची बैठक 22 जानेवारी रोजी झाली होती.

बातम्या आणखी आहेत...