आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी आंदोलनात तिसरी आत्महत्या:'काळ्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली',पंजाबमधील वकीलाने विष घेऊन केली आत्महत्या

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदींनी कायदे रद्द केले तर शेतकऱ्यांसाठी नवीन वर्ष शुभ होईल - शेतकरी संघटना

नवीन कृषी कायद्याविरोधात देशभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा 32 वा दिवस आहे. यात आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंजाबमदील एका वकीलाने रविवारी दिल्लीच्या टीकरी बॉर्डरवर सुरू असलेल्या आंदोलनापासून काही अंतरावर विष घेऊन आत्महत्या केली आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान झालेली ही आतापर्यंतची तिसरी आत्महत्या आहे.

यापूर्वी 16 डिसेंबरला करनाल जिल्ह्यातील सिंघडाचे रहिवासी 65 वर्षीय संत बाबा राम सिंह यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. तर, , 20 डिसेंबरला बठिंडाच्या रामपूरा फूलमध्ये गुरलाभ सिंग यांनी विष घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या घरच्यांनी सांगितले की, टीकरी बॉर्डरवरील आंदोलनातून घरी परतल्यानंतर गुरलाभ तणावात होते. त्यांचे शेवटचे शब्द होते, 'माहित नाही, काय होईल कोट्यावधी शेतकऱ्यांचे...'

'सरकारने शेतकऱ्यांचा आवाज ऐकावा म्हणून जीव देत आहे'

पोलिसांनी सांगितले की, वकील अमरजीत सिंग पंजाबच्या फाजिल्का जिल्ह्यातील जलालाबादचे रहिवासी होते. वकीलकीसोबत ते शेतीही करायचे. आत्महत्यापूर्वी लिहीलेल्या सुसाइड नोटमध्ये त्यांनी लिहीले की, नवीन कृषी कायद्याविरोधात आणि शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आत्महत्या करत आहे. नवीन कायद्यांमुळे फसवणूक झाल्यासारखे वाटत आहे.

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा शेतकऱ्यांनी थाळी वाजवून निषेध केला. भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, ज्याप्रकारे पंतप्रधानांनी म्हटले होते की, थाळी वाजवल्याने कोरोना पळून जाईल, त्याचप्रमाणे शेतकरी देखील थाळ्या वाजवत आहेत, जेणेकरून कृषी कायदे रद्द करता येतील.

राकेश टिकैत म्हणाले की, सरकारने लवकर सुधारावे यासाठी हा संकेत आहे. 29 डिसेंबर रोजी आम्ही सरकारसोबत चर्चा करणार आहोत. येणारे नवीन वर्ष सर्वांसाठी शुभ असावे आणि जर मोदीजींनी कायदे रद्द केले तर नवीन वर्ष आम्हा शेतकऱ्यांसाठी देखील शुभ होईल.

दुसरीकडे क्रांतिकारी शेतकरी युनियनचे अध्यक्ष दर्शन पाल म्हणाले की, पंजाब आणि हरियाणातील टोल खुली राहतील. 30 डिसेंबर रोजी सिंघु बॉर्डरवरून ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहोत. आम्ही दिल्लीसह संपूर्ण देशातील लोकांना आवाहन करीत आहोत की आपण येथे येऊन नवीन वर्ष आमच्याबरोबर साजरे करा.

शेतकऱ्यांच्या समर्थनात राहुल गांधी

बातम्या आणखी आहेत...