आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवीन शेतकरी कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा रविवारी 11 वा दिवस आहे. दरम्यान काँग्रेस, तृणमूल काँग्रेस (TMC) आणि तेलंगाना राष्ट्र समिती (TRS) ने 8 डिसेंबरला शेतकऱ्यांच्या भारत बंदला पूर्ण समर्थन देण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे नवीन रणनितीवर शेतकरी संघटनांमध्ये सिंघू बॉर्डरवर महत्त्वाची बैठक सुरू आहे. यामध्ये पुढील योजनांवर चर्चा होत आहे. बॉक्सर विजेंदर कुमारनेही कायदा मागे न घेतल्यास खेळरत्न पुरस्कार परत करण्याचा इशारा दिला आहे.
Boxer Vijender Singh joins the farmers' agitation at Singhu border (Haryana-Delhi border).
— ANI (@ANI) December 6, 2020
The farmers' protest at Singhu border, against Central Government's Farm laws, entered 11th day today. pic.twitter.com/uMOZLIyRU9
आंदोलकांसोबत विरोधीपक्ष
काँग्रेसने 8 डिसेंबरला होणाऱ्या शेतकऱ्यांच्या भारत बंदच्या समर्थनाची घोषणा केली. पक्षाचे प्रवक्ता पवन खेडा यांनी सांगितले की, आम्ही आंदोलनाच्या समर्थनार्थ आपल्या पक्षाच्या कार्यालयात प्रदर्शन करु. यामुळे राहुल गांधी यांचे शेतकर्यांसाठीचे समर्थन अधिक बळकट होईल. तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनीही भारत बंदला पाठिंबा जाहीर केला. तत्पूर्वी TMC चे खासदार सुदीप बंडोपाध्याय म्हणाले होते की पक्ष शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि भारत बंदमध्ये त्यांचे पूर्ण समर्थन करेल.
कृषी राज्यमंत्र्यांनी विरोधकांवर केला हल्ला
यानंतर कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी विरोधकांवर टीका केली आहे. त्यांनी विरोधकांवर शेतकऱ्यांना भडकावण्याचा आरोप करत म्हटले की, देशाच्या शेतकऱ्यांना नव्या कायद्याने फायदाच होणार आहे. पण काँग्रेस शासित राज्ये त्यांना भडकावत आहेत. राजकीय लोक आगीत तेल ओतत आहेत.
8 डिसेंबर रोजी भारत बंदचा अल्टीमेटम
याआधी शुक्रवारी शेतकरी म्हणाले की, तीन कृषी कायदे मागे न घेतल्यास ते 8 डिसेंबर रोजी भारत बंद आंदोलन केले जाईल. सर्व टोल प्लाझा ताब्यात घेण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. शुक्रवारी झालेल्या शेतकरी सभेनंतर त्यांचे नेते हरविंदरसिंग लखवाल म्हणाले- आगामी काळात आम्ही दिल्लीचे उर्वरित रस्तेही रोखू.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.