आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Farmer's Protest : Congress Leader Rahul Gandhi Criticize PM Narendra Modi On Farmers Agitation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कृषी आंदोलनावरून केंद्र सकारवर टीका:शेतकऱ्यांचे आपल्यावर कर्ज, अहंकाराची खुर्ची सोडा आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क द्या; कृषी कायद्यांवरुन राहुल गांधी यांचा मोदी सरकावर निशाणा

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेतकऱ्यांचे आपल्यावरील कर्ज त्यांना न्याय आणि अधिकार देऊनच उतरवले जाईल : राहुल गांधी

केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी धरणं देत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. सरकारने अहंकाराची खुर्ची सोडावी आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क आणि अधिकार द्यावा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

आंदोलक शेतकऱ्यांच्या समर्थनात राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर म्हटले की, "अन्नदाता रस्ते-मैदानावर धरणं देत आहे आणि खोटे टीव्हीवर भाषण, शेतकऱ्यांच्या मेहनतीचे आपल्यावर कर्ज आहे. हे कर्ज त्यांना न्याय आणि अधिकार देऊनच उतरवले जाईल. त्यांच्याशी गैरवर्तन, त्यांच्यावर लाठीमार करून, अश्रुधूर सोडून ते कर्ज उतरवले जाणार नाही. जागे व्हा, अहंकाराच्या खुर्चीवरून उतरून विचार करा आणि शेतकऱ्यांना त्यांचा अधिकार द्या" अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

काँग्रेसने सुरु केली #SpeakupForFarmers मोहीम

केंद्राच्या कृषी कायद्यांविरुद्ध काँग्रेसने #SpeakupForFarmers ही मोहीम हाती घेतली आहे. ‘मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अत्याचार केला. पहिल्यांचा काळा कायदा आणि आता लाठीमार केला. पण ते विसरले की जेव्हा शेतकरी आवाज उठवतो तेव्हा त्याचा आवाज संपूर्ण देशात घुमतो’, अशा शब्दात राहुल गांधी यांनी #SpeakupForFarmers या मोहीमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser