आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Farmers Protest : Congress Leaders, Including Priyanka Gandhi, Were Detained By The Police, Who Were Protesting Without Permission News And Updates

शेतकरी आंदोलनाचा 29 वा दिवस:प्रियंका गांधींसह काँग्रेसच्या नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, परवानगी नसतानाही काढत होते मोर्चा; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
परवानगी नसतानाही कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांना मोर्चा काढल्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतले. - Divya Marathi
परवानगी नसतानाही कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांना मोर्चा काढल्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतले.
  • राहुल म्हणाले- फक्त 2-3 लोकांचा फायदा व्हावा असे पंतप्रधानांना वाटते

कृषी कायद्यांविरोधी सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 29 वा दिवस आहे. विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाला राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विजय चौक ते राष्ट्रपती भवन दरम्यान मोर्चा काढायचा होता, मात्र पोलिसांनी यास परवानगी नाकारली. मात्र त्यानंतरही मोर्चा काढल्यानंतर प्रियंका गांधींसह अनेक कॉंग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

प्रियांका म्हणाल्या- शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणणे पाप आहे

प्रियांका म्हणाल्या की, भाजप नेते व समर्थक हे शब्द शेतकऱ्यांसाठी वापरत आहेत, ते पाप आहे. जर सरकारने शेतकर्‍यांना देशविरोधी म्हटले तर सरकार पापी आहे. या सरकारविरोधातील कोणताही असंतोष दहशतीच्या दृष्टिकोनातून पाहिला जात आहे. आम्ही हा मोर्चा शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवण्यासाठी काढत होतो. जेव्हा सरकार शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकेल व त्यांचा आदर करेल तेव्हाच त्यांचा प्रश्न सुटेल, असे त्यांनी माध्यमांना सांगितले.

राहुल म्हणाले- फक्त 2-3 लोकांचा फायदा व्हावा असे पंतप्रधानांना वाटते

राहुल गांधी आणि गुलाम नबी आझाद यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. राष्ट्रपती भवनातून निघाल्यानंतर राहुल म्हणाले की, शेतकरी आणि छोटे व्यापारी अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. जर कृषी व्यवस्थेला छेडले गेले तर त्याचा परिणाम संपूर्ण देशावर होईल. यामुळे असे कायदे रद्द करायला हवेत. फक्त 2-3 लोकांचा फायदा व्हावा असे पंतप्रधानांना वाटत आहे.

'मोहन भागवत मोदींविरूद्ध बोलले तर त्यांनाही अतिरेकी ठरवले जाईल'

प्रियंकांच्या अटकेबाबत विचारले असता राहुल म्हणाले की, आज देशात लोकशाही शिल्लक नाही. मारहाण करणे आणि ताब्यात घेणे या सरकारचे काम झाले आहे. सरकारच्या या धोरणांमुळे कोणत्याही तरुणांना देशात नोकरी मिळणार नाही. छोटे व्यवसाय संपतील. मोदी क्रोनी भांडवलदारांसाठी पैसे कमवत आहेत. जो कोणी त्यांच्या विरोधात उभे राहण्याचा प्रयत्न करेल त्याला दहशतवादी म्हटले जाईल. मग तो शेतकरी असो, मजूर असो किंवा मोहन भागवत असो. असे म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवी टीका केली.

बातम्या आणखी आहेत...