आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Farmers Protest : Farmers Cut Off Power Of Jio Tower; 30,000 Farmers Will Go To Delhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंदोलनाचा 29 वा दिवस:जिओ टॉवरची वीज तोडताहेत शेतकरी; 30 हजार शेतकरी दिल्लीला जाणार

पानिपत/नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हेलिपॅड खोदून हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांचा दौरा रोखला
  • केंद्राने शेतकऱ्यांसोबत चर्चेची वेळ ठरवण्यासाठी आणखी एक पत्र पाठवले

नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला २९ दिवस पूर्ण झाले आहेत. तरीही मागण्या पूर्ण होत नाहीत असे पाहून शेतकऱ्यांनी पंजाब आणि हरियाणात रिलायन्स जिओ टॉवरचा वीजपुरवठा कापण्यास सुरुवात केली आहे. सिरसाच्या गदराना गावात टॉवरची वीज कापण्यात आली आहे. पोलिस तिथे पोहोचले, पण ते वीजपुरवठा सुरू करू शकले नाहीत. आता अनेक टॉवरची वीज कापण्यात आल्याचे वृत्त आहे. रिलायन्स जिओच्या प्रवक्त्याने सांगितले की,‘कंपनी या घटनांवर टिप्पणी करू इच्छित नाही.’

पंजाब-हरियाणात नेत्यांना विरोध सुरूच आहे. हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांना जिंदला जायचे होते. शेतकऱ्यांनी हेलिपॅड खोदल्याने त्यांचा दौरा रद्द झाला. दुसरीकडे, पंजाबच्या खनौरी आणि हरियाणाच्या डबवाली येथून १५-१५ हजार शेतकऱ्यांचे दोन गट दिल्लीला येत आहेत. दरम्यान, सरकारने चर्चेची वेळ निश्चित करण्यासाठी आणखी एक पत्र शेतकरी संघटनांना आणि नेत्यांना पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, तिन्ही कायद्यांव्यतिरिक्त एमएसपीवर कायदा करण्याची नवी मागणी तर्कसंगत नाही. त्यामुळे त्यावर चर्चा करणे शक्य नाही.

कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचा आणखी एक गट सुप्रीम कोर्टात

कृषी कायद्यांच्या विरोधात भारतीय किसान युनियनतर्फे (लोकशक्ती) सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. तीत मागणी करण्यात आली की, याप्रकरणी आधी दाखल याचिकांसोबत आमची याचिकाही जोडण्यात यावी. याचिकेत म्हटले आहे की, कृषी कायदे घटनाविरोधी आणि शेतकरीविरोधी आहेत. या कायद्यांमुळे बाजार समित्या संपतील. कृषी क्षेत्रही कंपन्यांच्या हातात जाणार असल्याने शेतकरी या कायद्यांमुळे घाबरलेले आहेत.

राहुल गांधींना काँग्रेस पक्षच गांभीर्याने घेत नाही : कृषिमंत्री

राहुल गांधींना तर काँग्रेस पक्षच गांभीर्याने घेत नाही, देशाचा तर प्रश्नच येत नाही. काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याने शेतकऱ्यांच्या सह्या घेतल्या नाहीत आणि शेतकऱ्यांनीही केल्या नाहीत. राहुल यांना एवढीच चिंत्ता वाटत होती तर काँग्रेस पक्ष जेव्हा सत्तेत होता तेव्हाच काहीतरी करायला हवे होते. - नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय कृषिमंत्री

हरियाणाचे मुख्यमंत्री खट्‌टर यांनाही केला होता विरोध

शेतकऱ्यांनी याआधी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या कर्नाल दौऱ्याच्या वेळीही हेलिपॅडची माती खोदली होती. अनेक गावांत शेतकऱ्यांनी भाजप आणि दुष्यंत चौटालांच्या जेजेपीच्या नेत्यांना प्रवेशबंदी केली आहे.

पीएम मोदी आज ६ राज्यांच्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. या वेळी ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान सन्मान निधीचे १८,००० कोटी रुपये हस्तांतरित करण्यात येतील.

बातम्या आणखी आहेत...