आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Farmers Protest : Farmers Reject Governments's Proposal To Amend Agricultural Laws; Discussion Only If The Government Gives A Concrete Proposal: Farmers Association

शेतकरी आंदोलन:कृषी कायद्यांमध्ये दुरुस्त्यांचा केंद्राचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी पुन्हा फेटाळला; सरकारने ठोस प्रस्ताव दिला तरच चर्चा : शेतकरी संघटना

नवी दिल्ली/सिंघू बाॅर्डर/गाझीपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ममता बॅनर्जींनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी फोनवर केली चर्चा

केंद्राच्या तीन नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटनांनी सरकारशी चर्चा करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. ‘तुमच्या दुरुस्त्या निरर्थक आहेत आणि आश्वासने पोकळ आहेत. ती मान्य करता येऊ शकत नाहीत,’ असे शेतकरी संघटनांनी सरकारला सांगितले आहे. त्यांनी सरकारला आपले लेखी उत्तर पाठवले आहे.

स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनी शेतकऱ्यांनी सरकारला पाठवलेले पत्र वाचून दाखवले. त्यात म्हटले आहे की, शेतकरी तिन्ही कायदे मागे घेण्याची मागणी करत आहेत, त्यावर सरकारने काहीही स्पष्ट केलेले नाही. ज्या दुरुस्त्यांबाबत सरकार बोलत आहे, त्या शेतकऱ्यांनी आधीच्या सहा टप्प्यांच्या चर्चेत फेटाळून लावल्या आहेत. त्यात नवीन काहीही नाही. शेतकरी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याच्या मागण्याही करत आहेत. सरकारने ठोस प्रस्ताव दिला तर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. सरकार शेतकऱ्यांची उपेक्षा करून आगीशी खेळत आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते शिवकुमार कक्का यांनी व्यक्त केली.

ममता बॅनर्जींची आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी फोनवर चर्चा

डेरेक ओब्रायन, शताब्दी राॅय, प्रसून बॅनर्जी, प्रतिमा मंडल आणि मोहंमद नदीमुल हक या तृणमूल काँग्रेसच्या ५ खासदारांनी सिंघू बाॅर्डरवर जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी फोनद्वारे शेतकऱ्यांशी चर्चा करत त्यांना पाठिंबा दिला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांना आपल्या अधिकारांसाठी आंदोलन करावे लागत आहे हे अत्यंत दुर्दैवाचे आहे. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...