आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Farmers Protest : Haryana Punjab Farmers Delhi Chalo March Latest News 17 January

शेतकरी आंदोलनाचा 53 वा दिवस:आम्ही थंडीत मरतोय, चर्चेसाठी तारखा देत आम्हाला थकवण्याचाव सरकारचा कट ; शेतकऱी नेत्यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 53 वा दिवस आहे. शेतकऱ्यांची सरकारसोबत 10 टप्प्यांत चर्चा झाली, मात्र यातून काहीच निष्पन्न झाले नाही. आता पुढील बैठक मंगळवारी होणार आहे. या दरम्यान अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस हन्नान मोला म्हणाले की, "सुमारे 2 महिन्यांपासून आम्ही थंडीत मरत आहोत. सरकार आम्हाला फक्त तारखा देत असून मुद्द्यांना ताणून धरत आहेत. जेणेकरून आम्ही थकून आमची जागा सोडून देऊ. हा सरकारचा कट आहे."

कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, बहुतेक शेतकरी व तज्ञ शेती कायद्याच्या बाजूने आहेत. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर कायद्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही. आम्हाला आशा आहे की 19 जानेवारी रोजी होणार्या बैठकीत शेतकरी कायद्यांच्या कलमानुसार चर्चा करतील आणि कायदा मागे घेण्याव्यतिरिक्त त्यांना काय हवे आहे ते सांगतील.

बातम्या आणखी आहेत...