आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Farmers Protest : If Farmers Do Not Get MSP, I Will Resign, Warns Haryana Deputy Chief Minister Dushyant Singh Chautala

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हरियाणातील भाजप सरकार संकटात?:शेतकऱ्यांना MSP मिळाली नाही तर राजीनामा देईन, हरियाणचे उपमुख्यमंत्री दुष्यंतसिंह चौटाला यांचा इशारा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुष्यांत सिंह चौटाला यांच्या पक्षाची ओळख ही शेतकऱ्यांचा पक्ष म्हणून राहिलेली आहे

केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 16 वा दिवस आहे. इतक्या दिवसांपासून आंदोलन सुरू असून यावर केंद्राकडून काहीही तोडगा निघाला नाही. त्यामुळ शेतकऱ्यांनी आता हे आंदोलन अतिशय तीव्र केले आहे. या शेतकरी आंदोलनाची झळ आजूबाजूच्या राज्यांमधील राजकाणावरही बसत आहे. शेतकऱ्यांना MSP मिळाली नाही तर राजीनामा देईन असा इशारा हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत सिंह चौटाला यांनी दिला आहे. यामुळे हरियाणातील बहुमतापासून दूर असलेल्या भाजपच्या मनोहरलाल खट्टर यांचे सरकार संकटात येण्याची शक्यता आहे.

भाजप आणि जेजेपी यांची गुरुवारी एकत्रितरित्या एक बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये शेतकरी आंदोलनावर चर्चा झाली. ही बैठक पार पडल्यानंतर शेतकऱ्यांना MSP मिळाली नाही तर राजीनामा देईन, असे वक्तव्य चौटाला यांनी केल्याने हरियाणा सरकारवर अस्थिरतेचे सावट पसरले आहे. दरम्यान दुष्यांत सिंह चौटाला यांच्या पक्षाची ओळख ही शेतकऱ्यांचा पक्ष म्हणून राहिलेली आहे. त्यामुळे त्यांना भूमिका घेणे भाग आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser