आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Farmers Protest; (Kisan Andolan); Bharat Bandh Updates | Delhi Haryana Punjab Delhi

शेतकऱ्यांचा भारत बंद संपला:आंदोलनादरम्यान दिल्ली-सिंघु बॉर्डरवर हृदयविकाराच्या झटक्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू, 10 तासांनंतर खुली झाली दिल्ली-गाजीपूर सीमा

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेतकरी नेते ढवळे यांचा दावा - 25 पेक्षा जास्त राज्यांमध्ये बंद यशस्वी

तीन कृषी कायद्यांच्या विरोधात सोमवारी पुकारण्यात आलेला शेतकरी भारत बंद संपला आहे. सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत झालेल्या बंद दरम्यान अनेक राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग रोखण्यात आले होते. अनेक मार्ग वळवावे लागले. रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला. दिल्लीहून सुटणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये बंदचा परिणाम अधिक दिसून आला. दिल्ली-गाझीपूर सीमा देखील 10 तासांनंतर उघडण्यात आली.

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत म्हणाले की, भारत बंद संपूर्णपणे यशस्वी झाला. आता संयुक्त किसान मोर्चा पुढील रणनीती ठरवेल. दरम्यान, निदर्शनादरम्यान दिल्ली-सिंघू सीमेवर एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. भगेल राम असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शवविच्छेदनानंतर अधिक तपशील दिला जाईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

काँग्रेस, राजद, आम आदमी पार्टी, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी आणि डाव्या पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला. या बंदला अखिल भारतीय बँक अधिकारी परिसंघ (AIBOC) कडूनही पाठिंबा मिळाला. त्याचबरोबर सरकारने शेतकऱ्यांना आंदोलन सोडून संवादाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांच्या आक्षेपांवर विचार करण्यास तयार आहे.

पोलिस बॅरिकेडिंग तोडून नोएडा अथॉरिटीच्या दिशेने गेले शेतकरी
मोठ्या संख्येत शेतकरी नोएडा अथॉरिटीजवळ जमा झाले आणि पोलिस बॅरिकेडिंग तोडली. यानंतर ते नोएडा अथॉरिटीकडे गेले.

शेतकरी नेते ढवळे यांचा दावा - 25 पेक्षा जास्त राज्यांमध्ये बंद यशस्वी
अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांत भारत बंदला एवढा पाठिंबा कधीच मिळाला नव्हता. 25 पेक्षा जास्त राज्यांमध्ये बंद यशस्वी झाला आहे. शेतकरी विरोधी कायदे मागे घेतल्याशिवाय आणि एमएसपीची हमी देणारा कोणताही केंद्रीय कायदा नाही तोपर्यंत आम्ही लढण्यास तयार आहोत.

बातम्या आणखी आहेत...