आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Farmers Protest: Kisan Andolan Delhi Burari Ghazipur Tikri LIVE Update | Haryana Punjab Farmers Tractor Rally Delhi Chalo March Latest News Today 26 January

फुटीरतावादी संघटनांवर हिंसेचा आरोप:काँग्रेस खासदार म्हणाले - 'दिल्लीमध्ये हिंसा घडवणाऱ्यांमागे सिख फॉर जस्टिस, ट्रॅक्टर रॅली काढणारे शेतकरी नाही'

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खालिस्तान मूव्हमेंटमध्ये सामिल संघटना यात सहभागी असल्याचा आरोप

दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यान झालेल्या हिंसेमागे सिख फॉर जस्टिस म्हणजेच (SFJ) चा हात असल्याचे सांगितले जात आहे. पंजाबच्या लुधियानावरुन काँग्रेस खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनी या संघटनेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहे. त्यांनी म्हटले की, हिंसेमागे शिख फॉर जस्टिस संघटनेचा हात आहे. त्यांनीच पूर्ण कट रचला होता. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी कोणतीही हिंसा केलेली नाही.

त्यांनी घटनेचा तपास नॅशनल इनव्हेस्टिगेशन एजेंसी (NIA) कडून करण्याची मागणी केली आहे. एका चॅनलशी बोलताना खासदारांचे हे वक्तव्य समोर आले आहे. सिख फॉर जस्टिस अमेरिकेत अॅक्टिव्ह संघटना आहे आणि वेगळा देश खलिस्तानच्या मागणीचा समर्थक आहे.

खालिस्तान मूव्हमेंटमध्ये सामिल संघटना यात सहभागी असल्याचा आरोप

काही दिवसांपूर्वी बॉर्डरवर झालेल्या कार्यक्रमात शहीद-ए-खालिस्तान हे पुस्तक वाटण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वी बॉर्डरवर झालेल्या कार्यक्रमात शहीद-ए-खालिस्तान हे पुस्तक वाटण्यात आले होते.

शेतकरी आंदोलनामध्ये खालिस्तान मूव्हमेंटसंबंधीत अनेक संघटना अॅक्टिव्ह असल्याचे आरोप यापूर्वीही समोर आले आहेत. हे आंदोलनाच्या बहाण्याने फुटीरतावादी एजेंडा वाढवत आहेत. सिंघु बॉर्डरवर काही आठवड्यांपूर्वी मोफत पगडी घालून देण्याचा कार्यक्रम करण्यात आला होता.

यासोबत लावलेल्या बुक स्टॉलवरुन ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये मारल्या गेलेल्या जरनैल सिंह भिंडरावाला आणि पंजाबमध्ये फुटीरतावादाचे समर्थन करणाऱ्या त्यांच्या साथीदारांचा गौरव करणारे शहीद-ए-खालिस्तान या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. शेतकरी नेत्यांनी हे आरोप म्हणजे भाजप आणि केंद्र सरकारचा कट असल्याचे सांगितले होते.

इंडिया गेटवर खालिस्तानी झेंडा फडकावण्यावर ठेवले होते बक्षिस
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेतकरी आंदोलनासंबंधीत एक पोस्ट व्हायरल झाली होती. यामध्ये अपील करण्यात आली होती की, 26 जानेवारीला इंडिया गेटवर खालिस्तानी झेंडा फडकावणाऱ्याला अडीच लाख अमेरिकी डॉलर (जवळपास 1.82 कोटी रुपये) चे बक्षिस दिले जाईल. ही अपील सिख फॉर जस्टिसकडून करण्यात आली होती.

2007 मध्ये करण्यात आली स्थापना
SFJ ची स्थापना 2007 मध्ये झाली होती. याचा हेतू खालिस्तान नावाच्या आझाद देशाची स्थापना करणे आहे. संघटनेचा सर्वात मोठा चेहरा गुरपतवंत सिंह पन्नून आहे. त्याने पंजाब यूनिव्हर्सिटीमधून लॉचे शिक्षण घेतले आहे. तो अमेरिकेत राहतो आणि SFJ चा लीगल अॅडवायजरही आहेत.

बातम्या आणखी आहेत...