आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब-हरियाणाचे शेतकरी 77 दिवसांपासून दिल्ली बॉर्डरवर आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांनी बुधवारी सांगितले की, 18 फेब्रुवारीला देशभरात रेल्वे रोको आंदोलन केले जाईल. संयुक्त किसान मोर्चाचे डॉ. दर्शन पाल यांनी सांगितले की, या दिवशी दुपारी 12 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ट्रेन रोखल्या जातील. शेतकऱ्यांनी 12 फेब्रुवारीपासून राजस्थानमध्ये सर्व टोल फ्री करण्याची घोषणाही केली आहे.
शेतकऱ्यांनी ठरवले कार्यक्रम
लाल किल्ल्याच्या हिंसाचारातील आणखी एका आरोपीला अटक
तर 26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी सलग दुसर्या दिवशीही कारवाई केली. पोलिसांनी इक्बालसिंग या एका आरोपीला अटक केली. त्यावर 50 हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. इक्बालला पंजाबच्या होशियारपूर येथून अटक करण्यात आली आहे.
यापूर्वी पोलिसांनी पंजाबी गायक दीप सिद्धू यालाही अटक केली होती. दीपला पोलिसांनी करनाल बायपास येथून अटक केली आणि मंगळवारी सकाळी अटकेची माहिती दिली होती. सिद्धूवर लाल किल्ल्यामध्ये समाजकंटकांना भडकावण्याचा आरोप आहे. समाजकंटकांनी किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकावला होता आणि हिंसा उसळली होती.
सिद्धू अमेरिकेतून व्हिडिओ अपलोड करत होता
लाल किल्ल्याच्या घटनेनंतर सिद्धू फरार होता, परंतु त्यांच्या फेसबुक अकाउंटवर सतत व्हिडिओ अपलोड केले जात होते. वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू कॅलिफोर्नियामध्ये आपल्या एका महिला मैत्रिणीशी संपर्कात होता, जी एक अभिनेत्री देखील आहे. याच मैत्रिणीच्या माध्यमातून सिद्धू फेसबुकवर व्हिडिओ अपलोड करत होता. तसेच पोलिसांना चकमा देण्यासाठी वारंवार ठिकाणे बदलत होता. त्यामुळे सिद्धूचा सुगावा लावण्यावरून पोलिसांनी 1 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.