आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Farmers Protest: Kisan Andolan Delhi Burari LIVE Update | Haryana Punjab Farmers Delhi Chalo March Latest News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी आंदोलन:उद्या सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत भारत बंद; आठ राज्यांचे भारत बंदला समर्थन

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
एशियन गेम्समध्ये 2 वेळा गोल्ड मेडल जिंकणारे पैलवान करतार सिंह यांच्यासोबत इतर खेळाडू राष्ट्रपती भवनाकडे जात होते. - Divya Marathi
एशियन गेम्समध्ये 2 वेळा गोल्ड मेडल जिंकणारे पैलवान करतार सिंह यांच्यासोबत इतर खेळाडू राष्ट्रपती भवनाकडे जात होते.
  • 'तुम्ही केले तर शेतकऱ्यांचे कल्याण, आम्ही केले तर अन्याय'-रविशंकर प्रसाद

तीनही नवीन कृषी कायदे मागे घ्यावेत, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 12 वा दिवस आहे. या पार्श्वभूमिवर उद्या म्हणजेच 8 डिसेंबरला शेतकऱ्यांचा भारत बंद आहे. उद्या 11 वाजेपासून 3 पर्यंत शेतकऱ्यांचा भारत बंद असेल.

भारतीय शेतकरी युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की, आम्ही शांतीपूर्ण आंदोलन करत आहोत. आम्हाला सामान्य नागरिकांना त्रास द्यायचा नाही. मंगळवारी भारत बंदची वेळ सकाळी 11 वाजेपासून 3 पर्यंत असेल. याचे कारण म्हणजे, सकाळी 11 वाजेपर्यंत अनेकजण ऑफिसला जातात आणि दुपारी 3 वाजेपासून सुट्टीची वेळ सुरू होते.

शेतकऱ्यांच्या भारत बंदला आतापर्यंत 8 राज्यांनी समर्थन दिले आहेत. यात दिल्ली, पंजाब, राजस्थान, झारखंड, छत्तीसगड, तेलंगाणा, केरळ आणि महाराष्ट्र सरकारचा समावेश आहे.

यापूर्वी, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पंजाबमधील 30 खेळाडू आपले पुरस्कार परत करण्यासाठी राष्ट्रपती भवनाकडे निघाले असता, पोलिसांनी त्यांना वाटेतच रोखले.

अखिलेश यादव यांना लखनऊमधून ताब्यात घेतले

शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव आपल्या समर्थकांसह लखनऊपासून कन्नौजकडे निघाले होते, पण पोलिसांनी त्यांना लखनऊमध्ये अडवले. यानंतर अखिलेश तिथेच धरण्यावर बसले, यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी अखिलेश यांचे समर्थक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांना त्यांच्यावर लाठीचार्ज करावा लागला.

केजरीवाल म्हणाले- केंद्राने 9 स्टेडियमचे तुरुंगात रुपांतर करण्याचा दबाव टाकला होता

यापूर्वीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शेतकऱ्यांना भेटण्यासाठी सिंधू बॉर्डरवर पोहोचले. यावेळी ते म्हणाले की, 'शेतकऱ्यांचा मुद्दा योग्य आहे. आम्ही सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांसोबत आहोत. केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी आम्हाला 9 स्टेडियमचे तुरुंगात रुपांतर करण्यासाठी दबाव टाकला होता. पण, आम्ही त्यांच्या दबावाला बळी पडलो नाहीत.'

सरकारची टीका- तुम्ही केले तर शेतकऱ्यांचे कल्याण, आम्ही केले तर रस्त्यावर येता

कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शेतकरी आंदोलनावरुन विरोधकांवर जोरदार निशाना साधला. ते म्हणाले की, शेतकरी आंदोलनावरुन विरोधकांचा दुसरा चेहरा दिसत आहे. हे देशासाठी खूप घातक आहे. काँग्रेसने आपल्या घोषणापत्रात मंडी व्यवस्थेला बंद करण्याचे म्हटले होते. शरद पवारांनी यासाठी दोन मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहीले होते. आज विरोधक फक्त विरोध करायचा म्हणून करत आहेत. केजरीवालांनी आधी गजट पास केले होते, आता शेतकऱ्यांच्या बाजूने उभे होत आहेत. तुम्ही शेतकऱ्यांसाठी काही केले, तर कल्याण आणि आम्ही केले तर रस्त्यावर येता. हे योग्य नाही.

8 दिसंबरच्या बंदमध्ये अँम्बुलंस आणि लग्नाच्या गाड्यांना जाऊ देणार

शेतकऱ्यांच्या 8 डिसेंबरच्या भारत बंदला काँग्रेससह 20 राजकीय पक्ष आणि 10 ट्रेड यूनियंसने समर्थन दिले आहे. विरोधी नेत्यांनी 9 डिसेंबरला राष्ट्रपतींकडे भेटण्याची वेळ मागितली आहे. दरम्यान, शेतकरी नेते बलदेव सिंग निहालगड म्हणाले की, मंगळवारी होणाऱ्या बंददरम्यान अँम्बुलंस आणि लग्नाच्या गाड्यांना जाऊ दिले जाईल. त्यांना कुठेही अडवले जाणार नाही.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser