आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Farmers Protest: Kisan Andolan Delhi Burari LIVE Update | Haryana Punjab Farmers Delhi Chalo March Latest News News Today 3 February

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी आंदोलनाचा 70 वा दिवस:​​​​​​​हरियाणाच्या जींदमध्ये आज शेतकरी महापंचायत होणार, 50 हजार लोक येण्याची शक्यता

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तुरुगांत गेलेल्या आंदोलकांना मदत करण्यासाठी लीगल टीम बनवण्यात आली

कृषी कायद्याच्या विरोधातील शेतकरी आंदोलनाचा आज 70 वा दिवस आहे. आंदोलन मजबूत करण्यासाठी शेतकरी सातत्याने दिल्लीमध्ये पोहोचत आहेत. तर हरियाणाच्या जींद जिल्ह्याच्या कंडेला गावात आज शेतकरी महापंचायत बोलावण्यात आली आहे. यामध्ये 50 हजार लोक जमा होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, गाजीपूर सीमेवर आंदोलनाचे नेतृत्व करणारे शेतकरी नेते राकेश टिकैतही जींदच्या महापंचायतीत सहभागी होतील. तत्पूर्वी टिकैत मंगळवारी म्हणाले की, 'आम्ही सरकारला ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. जर तसे झाले नाही तर देशभरात ट्रॅक्टर रॅली काढली जाईल, यात 40 लाख ट्रॅक्टरचा सहभाग असण्याची शक्यता आहे. दरम्यान, आंदोलनही सुरूच राहणार आहे.

तुरुगांत गेलेल्या आंदोलकांना मदत करण्यासाठी लीगल टीम बनवण्यात आली
दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर रॅली दरम्यान 26 जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारानंतर ज्यांना सापडलेल जे लोक सापडले नाहीत किंवा ज्यांना अटक झाली आहे त्यांना मदत करण्यासाठी संयुक्त मोर्चाने एक कायदेशीर पथक तयार केले आहे. टीमच्या सदस्यांनी सांगितले की, ते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट त्यांनी घेतली होती. तिथून त्यांना माहिती मिळाली की तिहार तुरूंगात 115 लोक बंद आहेत. कॉंग्रेसच्या कायदेशीर कक्षाने हिंसाचार प्रकरणात शेतकऱ्यांना मदत करण्याची ऑफर दिली आहे. कॉंग्रेसने म्हटले आहे की कायदेशीर पथक शेतकरी नेत्यांना भेटेल.

6 फेब्रुवारीला चक्काजाम करणार शेतकरी
शेतकरी संघटनांनी मंगळवारी जाहीर केले आहे की 6 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय व राज्य महामार्ग रोखले जातील. भारतीय किसान मोर्चाचे नेते बलबीरसिंग राजेवाल म्हणाले की, शनिवारी दुपारी 12 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राष्ट्रीय व राज्य महामार्ग रोखण्यात येणार आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांची तयारी पाहता पोलिसही बॅरिकेडिंग मजबूत करत आहेत. टीकरी बॉर्डरवर मंगळवारी पहिले 4 फूट जाड सीमेंटची भिंत उभारुन 4 लेअरमध्ये बॅरिकेडिंग करण्यात आली. यानंतर रस्ता खोदून त्यामध्ये खिळे बसवण्यात आले. रस्त्यावर रोडरोलरही उभे करण्यात आले आहेत.

हरियाणाच्या 7 जिल्ह्यांमध्ये इंटरनेटवर बंदी वाढवली
26 जानेवारीला दिल्ली आणि नंतर 29 जानेवारीला सिंघू बॉर्डरवर झालेल्या हिंसेनंतर दिल्ली आणि हरियाणामध्ये इंटरनेट सर्व्हिस बंद करण्यात आली होती. हरियाणाच्या सरकारने 7 जिल्हे कैथल, पानीपत, जींद, रोहतक, चरखी दादरी, सोनीपत आणि झज्जरमध्ये व्हॉइस कॉल वगळता इंटरनेट सर्व्हिसेज, SMS आणि मोबाइलवर दिली जाणारी डोंगल सर्व्हिसवर बंदी बुधवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वाढवली आहे.

आंदोलनाच्या प्रकरणात ग्लोबल सेलिब्रिटीजच्या प्रतिक्रिया

  • इंटरनॅशनल पॉप सिंगर रिहानाने शेतकरी आंदोलनाविषयी सोशल मीडियावर कमेंट केली आहे. एक रिपोर्टचा लिंक शेअरर करत रिहाना यांनी इंटरनेट बॅन करण्यावर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी लिहिले - कुणीही यावर बोलत का नाही?
  • रिहानाच्या कमेंटवर अभिनेत्री कंगना रनोटने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले की, ते शेतकरी नाही दहशतवादी आहेत. ते देश तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण चीन याचा फायदा उचलून आपला अधिकारी घेईल, जसे त्यांनी अमेरिकेत केले. तुम्ही मूर्ख आहात, यामुळे गप्प बसला आहेत. आम्ही तुमच्याप्रमाणे आमचा देश विकत नाहीये.
  • स्वीडनच्या पर्यावरण कार्यकर्ता आणि नोबेल पुरस्कार विजेत्या ग्रेटा थनबर्गने सोशल मीडियावर म्हटले की, आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत.

बातम्या आणखी आहेत...