आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Farmers Protest: Kisan Andolan Delhi Burari LIVE Update | Haryana Punjab Farmers Delhi Chalo March Latest News Today 13 December

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकऱ्यांनी उपसले उपोषणाचे हत्यार:शेतकरी नेते उद्या दिल्ली बॉर्डरवर उपोषणाला बसणार, उत्तराखंडच्या शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांना भेटून कायद्याचे समर्थन केले

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काही संघटनांचा कायद्याला पाठींबा

कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाचा रविवारी 18 दिवस होता. शेतकरी नेत्यांनी रविवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी घोषणा केली की, सोमवारी दिल्ली बॉर्डरवर सर्व शेतकरी नेते सकाळी 8 पासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उपोषण करणार आहेत. याशिवाय सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले जाईल.

भारतीय शेतकरी यूनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की, आज गाझियाबाद बॉर्डरवर काही चुकीची तत्वे पोस्टर घेऊन आंदोलनात सामील झाले होते, त्यांना आम्ही हटवले आहे. यापुढे असा लोकांवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल.

शाह आणि तोमर यांची बैठक झाली

शेतकऱ्यांनी दिल्ली मार्चच्या पार्श्वभूमिवर जयसिंहपूर-खेडा(राजस्थान-हरियाणा) बॉर्डरवर सेक्योरिटी वाढवली आहे. सकाळपासून शेतकरी येथे एतक्र येत आहेत आणि दिल्लीकडे जाण्यासाठी तयार होत आहेत. शेतकऱ्यांच्या घोषणेनंतर आज कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणइ कृषी राज्य मंत्री सोम प्रकाश यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

काही संघटनांचा कायद्याला पाठींबा

शेतकरी आंदोलनात दोन गट पडलेले दिसत आहेत. उत्तराखंडच्या शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांची भेट घेऊन कायद्याचे समर्थन केले आहे. यापूर्वी हरियाणातील काही शेतकरी संघटनांनी कायद्याचे समर्थन केले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser