आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Farmers Protest: Kisan Andolan Delhi Burari LIVE Update | Haryana Punjab Farmers Delhi Chalo March Latest News Today 18 December

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी आंदोलनाचा 23 वा दिवस:मोदी आज मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांना संबोधित करणार, नवीन कृषी कायद्याचे फायदे सांगणार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुप्रीम कोर्टाने म्हटले - सरकारने कायदा होल्ड करण्यावर विचार करावा

तीन नवीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलनाचा आज 23 वा दिवस आहे. शेतकरी हे कायदे परत घेण्यावर अडून बसलेले आहेत. दरम्यान सरकार विविध पध्दतींनी शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांच्या कॉन्फ्रेंसमध्ये संबोधित करतील. ते कृषी कायद्याचे फायदे सांगतील.

मोदींचे अवाहन - कृषी मंत्र्यांचे पत्र अवश्य वाचा
2 दिवसांपूर्वीच कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ग्वालियरमध्ये शेतकरी संम्मेलनाला संबोधित केले होते. त्यांनी म्हटले होते की, नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आहे. तोमर यांनी गुरुवारी शेतकऱ्यांच्या नावाचे पत्रही लिहिले होते, ज्यामध्ये किमान समर्थन किंमत (MSP) सह दुसऱ्या चिंतांवर विश्वास दिला. मोदींनी शेतकऱ्यांसह संपूर्ण देशाला तोमर यांचे पत्र वाचण्याचे अवाहन करत सोशल मीडियावर शेअर केले आहे.

सुप्रीम कोर्टाने म्हटले - सरकारने कायदा होल्ड करण्यावर विचार करावा
शेतकऱ्यांना रस्त्यावरुन हटवण्याच्या अर्जावर सुप्रीम कोर्टात गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. कोटोर्टाने म्हटले की, शेतकऱ्यांना विरोध करण्याचा अधिकार आहे, मात्र एखाद्याची संपत्ती किंवा एखाद्याच्या जीवाला धोका होऊ नये. यासोबतच सल्ला दिला आहे की, विरोधाच्या पध्दतीत बदल करा, एखादे शहर जाम केले जाऊ शकत नाही. कोर्टाने सरकारला विचारले - या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत तुम्ही कृषी कायदा रोखू शकता का?

सध्या नवीन कृषी कायदा लागू करण्याचे नियम बनले नाही, जसे CAA बनलेले नाही लोकसभेचे माजी महासचिव पीडीटी आचारी यांनी कृषी कायद्याच्या विरोधाविषयी सुप्रीम कोर्टात कमेंटसंबंधीत प्रश्नाची उत्तरे सांगितली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser