आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Farmers Protest: Kisan Andolan Delhi Burari LIVE Update | Haryana Punjab Farmers Delhi Chalo March Latest News Today 27 January

शेतकरी आंदोलनात हिंसाचार:दिल्ली पोलिस आज पत्रकार परिषद घेणार; सिंघु, टीकरी बॉर्डर आणि लाल किल्ल्यावर सुरक्षा वाढवली

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्ली बॉर्डरवर कठोर सुरक्षा, हरियाणा-पंजाबमध्ये हाय अलर्ट

कृषी कायद्याच्या विरोधात 2 महिन्यापासून शांततेत सुरू असलेले आंदोलन मंगळवारी हिंसक झाले. ट्रॅक्टर रॅली दरम्यान आंदोलकांनी केवळ नियमच मोडले नाहीत तर तोडफोड आणि सुरक्षादलाला मारहाणही केली. दिल्ली पोलिस आज पत्रकार परिषद घेणार आहेत.

मंगळवारी झालेल्या हिंसाचाराच्या घटनांवर पोलिसांनी आतापर्यंत 22 गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे शेतकरी नेत्यांची चिंता वाढली असावी. आज 12 वाजता सिंघु सीमेवर त्यांची बैठक होईल. एखादी महत्त्वाची घोषणा किंवा काही मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

दिल्ली बॉर्डरवर कठोर सुरक्षा, हरियाणा-पंजाबमध्ये हाय अलर्ट
दिल्लीमध्ये मंगळवारी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये 86 पोलिस कर्मचारी जखमी झाले. अनेक शेतकरीही जखमी झाले. ट्रॅक्टर उलटल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. आज पोलिस पूर्णपणे तयार आहेत. सिंघु बॉर्डर, टीकरी बॉर्डर आणि लाल किल्ल्यावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तिकडे हरियाणा आणि पंजाब सरकारने आपल्या-आपल्या राज्यांमध्ये हाय अलर्ट केला आहे.

शेतकरी नेता म्हणाले - हिंसा करणाऱ्यांना स्वतःला त्रास सहन करावा लागेल
मंगळवारी ट्रॅक्टर रॅलीमध्ये सामिल हिंसाचार करणारे बॅरिकेड तोडून पुढे गेले आणि लाल किल्ल्यापर्यंत पोहोचले. त्यांनी किल्ल्यावर चढून धार्मिक झेंडा फडकावला. या घटनेवर भारतीय शेतकरी यूनियनचे प्रवक्ता राकेश टिकैत म्हणाले, 'ज्यांनी हिंसा पसरवली आणि लाल किल्ल्यावर झेंडा फडकावला ते स्वतः त्रास सहन करतील. गेल्या 2 महिन्यांपासून एका विशिष्ट समुदायाविरूद्ध कट रचला जात आहे. ही चळवळ शीखांची नसून शेतकर्‍यांची आहे'

बातम्या आणखी आहेत...