आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Farmers Protest: Kisan Andolan Delhi Burari LIVE Update | Haryana Punjab Farmers Delhi Chalo March Latest News Today 28 January

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी नेत्याला अश्रु अनावर:राकेश टिकैत म्हणाले- शेतकर्‍यांना ठार मारण्याचा कट रचला जातोय; कायदे परत घ्या नाहीतर आत्महत्या करेल

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेतकरी रॅलीमध्ये हिंसाचाराप्रकरणी दिल्ली पोलिसांनी बुधवारी 200 लोकांना ताब्यात घेतले

गाजीपुर आणि सिंघु बॉर्डरवर गुरुवारी दुपारनंतर मोठ्या प्रमाणात दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. गाजीपुरमध्ये विज आणि पाणी सप्लाय बंद करण्यात आला आहे. पोलिसांनी आज शेतकऱ्यांना रस्ता रिकामा करण्यास सांगितले आहे.

दिल्लीच्या बॉर्डरवर पोलिसांच्या कारवाईनंतर भारतीय शेतकरी यूनियनचे नेते राकेश टिकैत यांना अश्रु अनावर झाले. गाजीपुर बॉर्डरवर टिकैत म्हणाले की, 'शेतकऱ्यांवर अत्याचार केला जात आहे. त्यांना मारण्याचा कट रचला जात आहे. सरकारने कायदे परत न घेतल्यास मी आत्महत्या करेल. मी या देशातील शेतकऱ्यांना उद्धवस्त होऊ देणार नाही.'

यापूर्वी टिकैत म्हणाले होते की, 'मी सरेंडर करणार नाही, आंदोलनही संपवणार नाही. समाजाची बदनामी करण्याचे हे षडयंत्र आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने चौकशी करावी. यात सर्व कॉल रेकॉर्ड सामील करावेत.'

दरम्यान, टिकैत यांच्या वक्तव्याचा त्यांच्या संघटनेच्या प्रमखांनी विरोध केला आहे. भारतीय किसान युनियनचे प्रमुख नरेश टिकैत यांनी सर्व शेतकऱ्यांना आंदोलन संपवून परत जाण्यास सांगितले. ते म्हणाले की, सुविधा बंद केल्यानंतर आम्ही आंदोलन कसे करणार. मी सर्व नेते आणि शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की, त्यांनी आंदोलन संपवून घरी जावे. शेतकऱ्यांना मारहाण होण्यापेक्षा आंदोलन संपलेले बरे.'

मुख्यमंत्री योगी अधिकाऱ्यांना म्हणाले- सर्व शेतकऱ्यांचे आंदोलन संपवा

सुत्रांनी सांगितल्यानुसार, आज सायंकाळपर्यंत दिल्ली आणि यूपी पोलिस आंदोलकांना हटवण्यासाठी जॉइंट ऑपरेशन करू शकते. उत्तर प्रदेश सरकारने जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे आंदोलन संपवण्याचे आदेश दिले आहेत.

पोलिस पोहोचताच गाजीपूर सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. पोलिसांनी येथे लावलेले पोर्टेबल टॉयलेट्स हटवण्यास सुरुवात केली आहे. यूपी रोडवेजच्या डजनभर बस देखील येथे उभ्या करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे बागपतमध्ये 40 दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी बुधवारी रात्री हटवले होते. दुसरीकडे सिंघु सीमेवरही पोलिसांचा फौजफाटा वाढवला आहे.

शेतकऱ्यांविरोधात लुकआउट नोटीस जारी

पोलिसांनी गुरुवारी शेतकरी नेत्यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली. म्हणजेच ते विना परवानगी विदेशात जाऊ शकत नाहीत. दरम्यान एका तासानंतर वृत्त आले की, लाल किल्ल्यावर हिंसा करणाऱ्यांवर पोलिसांनी राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

लुकआउट नोटीस कोणकोणत्या शेतकरी नेत्यांच्या विरोधात जारी करण्यात आली आहे याची पुष्टी झालेली नाही. मात्र असे मानले जात आहे की, ज्या 37 नेत्यांच्या विरोधात पोलिसांनी बुधवारी FIR दाखल केला होता, त्यांच्याच विरोधात ही नोटीस जारी करण्यात आली आहे.

दुसरीकडे, शेतकरी नेता युद्धवीर सिंह यांनी हिसेंच्या घटनेवर माफी मागत म्हटले की, 'प्रजासत्ताकदिनी जे झाले ते लाजिरवाणे आहे. मी गाजीपूर बॉर्डरजवळ होतो. जे समाजकंटक तिथे घुसले त्यामध्ये आमच्या लोकांचा समावेश नव्हता. तरीही मला हे लाजिरवाणे वाटते आणि 30 जानेवारीला उपवास ठेवून आम्ही प्रायश्चित करु'

20 शेतकरी नेत्यांना पोलिसांनी 3 दिवसात उत्तर मागितले

रॅलीच्या अटी खंडित केल्याच्या आरोपाखाली 37 शेतकरी नेत्यांविरूद्ध पहिले एफआयआर नोंदवण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा 20 शेतकरी नेत्यांना नोटीस जारी करुन 'आपल्यावर कायदेशीर कारवाई का होऊ नये, 3 दिवसात याचे उत्तर द्या' अशी विचारणा करण्यात आली.

आतापर्यंत नोटीस दिल्या गेलेल्या 4 नेत्यांची नावे समोर आली आहेत. हे नेते योगेंद्र यादव, दर्शन पाल, बलदेवसिंग सिरसा आणि बलबीरसिंग राजेवाल आहेत. पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये असेही म्हटले आहे की प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्याची तोडफोड करणे देशविरोधी कृती आहे.

अमित शहांनी हिंसाचारात जखमी झालेल्या पोलिसांची घेतली भेट

मंगळवारी झालेल्या हिंसाचारामध्ये दिल्ली पोलिसांचे 300 हून अधिक जवान जखमी झाले. त्यापैकी बरेच जण अद्याप रुग्णालयात दाखल आहेत. यातील काही जवानांची स्थिती जाणून घेण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी सुश्रुत ट्रॉमा सेंटर येथे भेट दिली.

टिकैत यांचा धमकीवजा इशारा
ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचाराबद्दल भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्याची वृत्ती बदललेली नाही. टिकैत यांनी आता सरकारला धमकावलेल्या सूरात इशारा दिला आहे. कारण, बुधवारी रात्री 8 वाजता वीज गेल्याने टिकैत हे चिडले होते.

टिकैट म्हणाले की, 'सरकार दहशत पसरवण्याचे काम करत आहे. पोलिस-प्रशासनाने असे कोणतेही काम करू नये. जर या प्रकारची कारवाई केली गेली तर सर्व सीमा तेथे आहेत. ठीक आहे ... आणि जे शेतकरी गावांमध्ये आहे तिथे त्यांना संगू. मग काही अडचण आल्यास तेथील स्थानिक पोलिस स्टेशनवर शेतकरी जातील. हे सरकारने लक्षात घ्यावे. अशा प्रकारही कोणतीही हालचाल तिथे झाली तर संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल.