आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
26 जानेवारीला शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये हिंसेनंतर पोलिस गेल्या 2 दिवसांपासून कारवाई करत होते. यामुळे गुरुवारी शेतकरी आंदोलन संपेल असे वाटले होते. मात्र गेल्या रात्री गाझीपूर सीमेवर जे झाले त्यावरुन शेतकरी आंदोलन अजून जास्त तीव्र झाल्याचे दिसत आहे.
गुरुवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत गाझीपूर सीमेवर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात झाल्यानंतर शेतकर्यांना घरी पाठवण्यात येईल, असे वातावरण होते. पण, पोलिसांना मध्यरात्री परत यावे लागले. कारण, शेतकर्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याची तयारी सुरू केली होती. यासंदर्भात मुझफ्फरनगर येथे आज सकाळी 11 वाजता महापंचायत बोलावण्यात आली आहे.
टीकैत आंदोलन संपवण्यासाठी तयार होते, आमदाराच्या धमकीने अडून बसले
भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी सायंकाळी सहा वाजता अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत आंदोलन स्थळावरुन माघार घेण्यास सहमती दर्शवली होती. परंतु, काही काळानंतर भाजप आमदार नंद किशोर यांच्या एंट्रीने या प्रकरणाने यू-टर्न घेतला.
नंद किशोर आपल्या समर्थकांसोबत आंदोलन स्थळावर पोहोचले. त्यांनी पोलिसांना म्हटले की, आंदोलकाना रविवारपर्यंत येथून हटवा अन्यथा आम्ही हटवू. यानंतर टिकैत भडकले. त्याने म्हटले की, 'भाजपचे आमदार पोलिस फोर्ससोबत मिळून शेतकऱ्यांना संपवण्यासाठी आले आहेत. यामुळे आता आम्ही कुठेही जाणार नाही' राकेश टिकैत यांचे मोठे भाऊ नरेश टिकैत यांनीही म्हटले की, तिन्हीही काळ्या कायद्यांचा बंदोबस्त केल्यानंतरच परत जाऊ.
रात्री 10 वाजता टिकैत यांच्या गावात आवाहन - प्रत्येक शेतकरी गाजीपूरमध्ये पोहोचेल
गाझीपूर सीमेवरील बदललेली परिस्थिती पाहता रात्री 10 वाजता मुजफ्फरनगरच्या सिसैली गावात राकेश टिकैत यांच्या घरी 'गाजीपूर कूच' चे नारे देत असलेला जमाव पोहोचला. याच काळात जाट नेता आणि RLD प्रमुख अजीत सिंह यांनी राकेश टीकैत यांना फोन करुन आंदोलनाला समर्थनाची घोषणा केली. RLD चे नेता जयंत चौधरी यांनीही म्हटले की, शुक्रवारी टिकैत यांची भेट घेऊ. यासोबतच संपूर्ण प्रकरणात जाट पॉलिटिक्सची एंट्री झाली.
रात्री 11 वाजेपासून मेरठ, मुजफ्फरनगर, गाजियाबाद, शामली आणि बागपत येथून लोकांनी गाझीपूरसाठी कूच करणे सुरू केले. UP व्यतिरिक्त हरियाणामध्येही अनेक गटांनी घोषणा केली की, ते दिल्ली बॉर्डरवर पोहोचतील. हरियाणाच्या भिवानी येथून 1 हजार ट्रॅक्टरवर शेतकरी रवाना झाले आहेत. दोन्ही राज्यांमधील परिस्थिती अधिकच बिकट झाल्याचे पाहून गाझीपूर सीमेवर कारवाईच्या आदेशांच्या प्रतीक्षेत असलेले पोलिस दल माघार घेऊ लागले आहेत.
लाठी-गोळ्यांविषयी बोलणाऱ्या टीकैत यांचे अश्रू निघाले
गाझीपूर सीमेवर UP पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता आंदोलन स्थळाला चारही बाजूने सील केले. मोठ्या पोलिस बंदोबस्तात शेतकऱ्यांना तेथून हटण्याची नोटीस देण्यात आली. अधिकाऱ्यांनी म्हटले की, आंदोलन हटवूनच राहू. याचा परिणाम असा झाला की, लाठी आणि गोळ्यांचे वक्तव्य करुन वादात आलेले टिकैत भावनिक खेळ खेळू लागले. त्यांनी रडत म्हटले की, 'मला मारण्याचा कट रचला जात आहे. मी आत्महत्या करुन घेईल. देशातील शेतकऱ्यांना उद्धवस्त होऊ देणार नाही.'
सिंघु सीमाही चारही बाजूने सील, पक्के बॅरिकेड्स लावले
गुरुवारी हरियाणाच्या सिंघु सीमेवर सुरक्षा दलाची तैनातही वाढवण्यात आली होती. आंदोलन स्थळाला सर्व बाजूने ब्लॉक करण्यात आले. आता येथे कोणी येऊ शकत नाही, किंवा कोणीही बाहेर जाऊ शकत नाही. येथे पक्के बॅरिकेट्स बसवण्यात आले आहेत. दुसरीकडे, टीकरी सीमेवरही भारी फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या दोन्ही सीमा ही शेतकरी चळवळीचे मोठे पॉइंट्स आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.