आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Farmers Protest: Kisan Andolan Delhi Burari LIVE Update | Haryana Punjab Farmers Delhi Chalo March Latest News Today 30 January

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी आंदोलनाचा 66 वा दिवस:शेतकरी आंदोलनावर पंतप्रधानांनी सोडले मौन; म्हणाले - चर्चेतून तोडगा निघेल, फक्त एक फोन कॉल करा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गाझीपूर, सिंघू सीमेवर इंटरनेट तर एनएच 24 मार्ग बंद

तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या ६६ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठिय्या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी प्रथमच भाष्य केले. शनिवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित सर्वपक्षीय बैठकीत त्यांनी शेतकऱ्यांना चर्चेचे आवाहन केले.

“केवळ एक फोन कॉल करा. त्या वेळी चर्चा करण्यासाठी मी उपलब्ध असेन,’ असे सांगून कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यामार्फत शेतकऱ्यांना दिलेला प्रस्ताव पुन्हा देत आहे. नव्या कायद्यांमध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत. शेतकरी नेते काही निर्णयाप्रत आले असल्यास पुन्हा चर्चेस तयार आहोत. सरकारने २२ जानेवारी रोजी दिलेला प्रस्ताव अद्यापही कायम आहे. कोणत्याही समस्येवर चर्चेद्वारेच तोडगा काढणे आवश्यक आहे, असे मोदी म्हणाले. २२ जानेवारी रोजी केंद्र सरकारने ठेवलेल्या प्रस्तावानुसार नवे कृषी कायदे दीड वर्ष स्थगित ठेवले जातील त्यासोबतच किमान आधारभूत किंमत (एमएसपी) बाबत तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन केली जाईल मात्र कृषिमंत्री तोमर यांचा हा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला होता.

गांधीजींची पुण्यतिथी शेतकऱ्यांचा उपवास

२६ जानेवारी रोजी सिंघू आणि टिकरी सीमेवर झालेल्या हिंसाचाराच्या निषेेधार्थ शनिवारी महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिवसभर उपवास केला. दरम्यान, कंेद्र सरकारशी बोलणी करण्यासाठी शेतकरी पहिल्या दिवसापासूनच तयार आहेत; परंतु दोषींना शिक्षा व्हावी, अशी मागणी योगंेद्र यादव यांनी केली आहे.

मथुरेतही शेतकऱ्यांची जंगी महापंचायत

राकेश टिकैत यांच्या समर्थनार्थ मथुरा जिल्ह्यात शेतकऱ्यांची महापंचायत झाली. यात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. रालोद आणि सपा नेत्यांनीही महापंचायतमध्ये हजेरी लावली. दुसरीकडे पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांचे जथ्थे सिंघू-टिकरी सीमेवर पोहोचले

हिंसाचाराविरोधात कारवाई : दिल्ली, जालंधरमध्ये धाडी; ८४ जणांना अटक

प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराचे पुरावे गोळा करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी लाल किल्याची तपासणी केली. याप्रकरणी ३८ एफआयआर नोंदवले आणि ८४ जणांना अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी जालंधरमध्येही धाडी टाकल्या. लाेकांना चिथावणी देण्याचा आराेप असलेल्या दीप सिंधू याने दाेन दिवसांनंतर शरण येऊ, असे सांगितले.

राजकीय पक्षांचा राकेश टिकैत यांना पाठिंबा

भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांना राजकीय पक्ष उघडपणे पाठिंबा देत आहेत. शनिवारी उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजयकुमार लल्लू, दिल्ली काँग्रेस नेत्या अलका लांबा, हरियाणातील काँग्रेस खासदार दीपेंदरसिंह हुडा आणि इनेलोचे प्रमुख अभयसिंह चौटाला हे समर्थकांसह गाझीपूर सीमेवर पोहोचले.

गाझीपूर, सिंघू सीमेवर इंटरनेट तर एनएच २४ मार्ग बंद

शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या समर्थनार्थ पश्चिम उत्तर प्रदेशातून शनिवारी हजारो शेतकऱ्यांचा जथ्था गाझीपूर सीमेवर पोहोचला. त्यामुळे एनएच २४ हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करावा लागला. दरम्यान, केंद्र सरकारने गाझीपूर, टिकरी आणि सिंघू सीमेवर शुक्रवारपासून ते रविवारी रात्री ११ वाजेपर्यंत इंटरनेट बंद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...