आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत असलेले शेतकरी शनिवारी देशभरात चक्काजाम करतील. संयुक्त शेतकरी मोर्टाने सांगितले की, शनिवारी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत हे चक्काजाम असेल. दरम्यान शेतकरी यूनियनचे प्रवक्ता राकेश टिकैत यांनी सांगितले की, आम्ही उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि दिल्लीमध्ये रोड जाम करणार नाही. येथील जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना केवळ निवेदन देण्यात येणार आहे. टिकैत यांनी म्हटले की, आमच्याकडे आता पुरावे आहेत की, काही लोक येथे हिंसा घडवून आणू शकतात.
दिल्ली-NCR मध्ये केंद्रीय राखीव पोलिस दल(CRPF)च्या 31 कंपन्यांची तैनाती 2 आठवड्यांसाठी पुन्हा वाढवली आहे. दिल्लीमध्ये तैनात CRPF च्या सर्व यूनिट्सला आपल्या बसवर लोखंडाची जाळी बसवण्यास सांगितले आहे.
दुसरीकडे हरियाणाचे डीजीपी मनोज यादव यांनी सांगितले की, काहीही गोंधळ होऊ नये यासाठी SP जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांशी चर्चा करत आहेत. पोलिसांकडून ट्रॅफिक एडवाइजरीही जारी करण्यात येईल. यामुळे लोकांना घरातून बाहेर निघण्यापूवर्वी कळेल की, कोणत्या रुटने जायचे आहे.
UP, राजस्थानमध्ये आज किसान पंचायत
आंदोलनाला मजबूत करण्यासाठी आजपासून उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये किना पंचायतची सीरीज सुरू केली जाईल. जी फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत सुरू राहिल. याचे आयोजन राष्ट्रीय लोक दल (RLD)कडून केले जाऊ शकते. RLD ने गेल्या आठवड्यात शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्याची घोषणा केली होती.
RLD चे उपाध्यक्ष जयंत चौधरी यांनी गुरुवारी म्हटले की, हे आंदोलन खूप मोठे आहे हे सांगणे किसान पंचायतचा हेतू आहे. यामध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आणि दुसऱ्या लोकांना या मुद्द्याची संवेदनशीलता सांगणे ही राजकीय पक्षांची जबाबदारी आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.