आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Farmers Protest: Kisan Andolan Delhi Burari LIVE Update | Haryana Punjab Farmers Delhi Chalo March Latest News Today 6 February

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकऱ्यांचा 3 तास चक्काजाम:जयपूरमध्ये उन्हामुळे त्रस्त झालेले काँग्रेसी अर्ध्या तासात परतले; महात्मा गांधी जयंतीपर्यंत आंदोलन सुरु राहणार, राकेश टिकैत यांची घोषणा

नवी दिल्ली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारची दरोडेखोरांसोबत तुलना

कृषी कायद्यांविरोधात मागील 73 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी शनिवारी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड वगळता देशभरात चक्काजाम केला. दुपारी 12 ते 3 या वेळेत झालेल्या जामचा सर्वाधिक प्रभाव राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमध्ये दिसून आला. आंदोलकांनी या राज्यांमधील राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग रोखले होते.

काँग्रेसने या चक्काजामचे समर्थन केले, तसेच अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते या चक्काजाममध्ये सामील झाले. मात्र जयपूरमध्ये अजमेर आणि टोंक बायपासवरील चक्काजाममध्ये सहभागी झालेले काँग्रेस कार्यकर्त्यांना ऊन्हाचा त्रास सहन न झाल्याने ते अर्ध्या तासात परतले.

सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंतचा वेळ, टिकैत यांचा इशारा

शनिवारी चक्काजाम संपल्यानंतर भारतीय किसान युनियनचे नेता राकेश टिकैत म्हणाले की, 'दबावात सरकारशी चर्चा करणार नाही. हे कायदे मागे घेण्यासाठी सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंतचा वेळ दिला आहे. त्यानंतर आम्ही पुढील रणनीती बनवू. जोपर्यंत कायदे मागे घेत नाही, तोपर्यंत शेतकरी घरी परतणार नाहीत.' असा इशाराही टिकैत यांनी दिला आहे.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणाले- सरकार दरोडेखोरांसारख्या पद्धती अवलंबत आहे

शेतकऱ्यांच्या चक्काजाम दरम्यान काँग्रेस शासित छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. बघेल यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी अनेक बॅरिकेड लावणे आणि खिळे ठोकल्याप्रकरणी सरकारची तुलना दरोडेखोरांसोबत केली. ते म्हणाले की, 'जुन्या काळात दरोडेखोर गावांत दरोडा टाकण्यासाठी खिळे टाकून सर्व मार्ग बंद करत होते, केवळ आपल्या माणसांना पळण्यासाठी जागा सोडत होते. आता सरकार ही पद्धत अवलंबत आहे'

सरकारने स्वतः शेतकऱ्यांचा आंतरराष्ट्रीय मुद्दा केला. कारण शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ जागतिक सेलिब्रिटींच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देऊन सरकार त्यांना प्रोत्साहन देत आहे असा आरोप बघेल यांनी केला. तसेच लवकरच यावर तोडगा निघाला तर शेतकरी आंदोलन देशभर पसरेल., असेह बघेल म्हणाले.

कुठे काय झाले?

  • राजस्थान : कोटामध्ये आंदोलकांनी ट्रॅक्टर रॅली काढली. तर अलवरमध्ये शेतकऱ्यांनी 10-12 ठिकाणांवर दगड आणि काटेरी झाडे टाकून राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग जाम केला. काँग्रेसने शेतकऱ्यांच्या चक्काजामचे समर्थन केले.
  • हरियाणा-पंजाब : शेतकऱ्यांचे आंदोलन पाहता शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या होत्या. रोडवेजच्या बसही बंद होत्या. भिवानी आणि जिंदमध्ये 15-15, यमुनानगर मध्ये 12, करनालमध्ये 10 आणि कैथलमध्ये 5 ठिकाणी चक्काजाम करण्यात आले. हिसा आणि पानीपतमध्ये आंदोलकांनी राष्ट्रीय आणि राज्य हायवे जाम केले. दुसरीकडे पंजाबमध्ये भाजप वगळता सर्व राजकीय पक्ष जामच्या समर्थनात दिसले.

10 मेट्रो स्टेशन बंद

यापूर्वी दिल्लीमध्ये खबरदारी म्हणून 10 मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले होते. यामध्ये मंडी हाउस, ITO, दिल्ली गेट, विद्यापीठ, खान मार्केट, नेहरु प्लेस, लाल किल्ला, जामा मशीद, जनपथ आणि केंद्रीय सचिवालय मेट्रो स्टेशनचा समावेश याहे. येथे एकूण 285 मेट्रो स्टेशन आहेत.

26 जानेवारीला झालेल्या हिंसोच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा
26 जानेवारीला दिल्लीमध्ये झालेल्या हिंसेमुळे प्रशासन जास्त अलर्ट आहे. दिल्ली-NCR मध्ये पोलिस, पॅरामिलिट्री आणि रिझर्व फोर्सचे 50 हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. दिल्लीमध्ये तैनात CRPF च्या सर्व यूनिट्सला म्हटले आहे की, त्यांनी आपल्या बसवर लोखंडाची जाळी लावावी. जेणेकरुन दगडफेक झाल्यावर इजा होणार नाही.