आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Farmers Protest (Kisan Andolan) | Delhi Police Files FIR Against Sweden Climate Change Activist Greta Thunberg, Climate Change Activist Greta Thunberg, Delhi Police Cyber Cell, Climate Activist Disha Ravi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टूलकिट केसमध्ये पोलिसांचे नवे खुलासे:कार्यकर्ती दिशाने टेलीग्रामच्या माध्यमातून ग्रेटा थनबर्कपर्यंत पोहोचवले टूलकिट, वकील निकितानेही केले होते संपादित

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ग्रेटा थनबर्कने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ टूलकिट शेअर केली होती

ग्रेटा थनबर्ग टूलकिट केसमध्ये कार्यकर्ती दिशा रवीच्या अटकेच्या दुसऱ्या दिवशी दिल्ली पोलिस त्यांच्या निकवर्तीयांचा शोध घेत आहेत. दिल्लीच्या एका कोर्टाने सोमवारी दिशाच्या दोन साथीदार निकिता जेकब आणि शांतनुविरोधात अजामिनपात्र वारंट जारी केला. निकिताने याविरोधात मुंबई हायकोर्टात ट्रांजिट बेलचा अर्ज दाखल केला आहे, ज्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

दरम्यान, पोलिस तपासात असे निष्पन्न झाले आहे की, बंगळुरूची कार्यकर्ती दिशा, मुंबईची कार्यकर्ती निकिता आणि शांतनु यांनी खलिस्तानी समर्थक म्हणून ओळखल्या जाणार्‍या पोएटीक जस्टिस फाऊंडेशनचे संस्थापक एमओ धालीवाल यांच्याशी झूम अॅपवर मीटिंग केली होती. या सभेचा हेतू 26 जानेवारीपूर्वी सोशल मीडियावर खळबळ निर्माण करणे हा होता. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलचे सहआयुक्त प्रेम नाथ यांच्या मते, दिशा, निकिता आणि शांतनु यांना कॅनडामधील रहिवासी असलेल्या पुनीत नावाच्या एका महिलेने या संघटनेशी जोडले होते. जाणून घेऊया की, हे प्रकरण काय आहे आणि आतापर्यंत जी नावे समोर आली आहेत, त्यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे.

ग्रेटा थनबर्कने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ टूलकिट शेअर केली होती
हे प्रकरण देशातील शेतकऱ्यांसंबंधीत आहे. जे दिल्लीत 82 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. 3 फेब्रुवारीला 18 वर्षांची कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने दोन सोशल मीडिया पोस्ट लिहिल्या होत्या. पहिल्या पोस्टमध्ये तिने शेतकऱ्यांचे समर्थन केले होते. दुसर्या पोस्टमध्ये एक टूलकिट शेअर केली होती. ही टूलकिट एक गूगल डॉक्यूमेंट होती. यामध्ये ‘अर्जेंट और ऑन ग्राउंड एक्शंस’ चा उल्लेख होता.

दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने हे सरकारवविरोधी मानत टूलकिट बनवणाऱ्यांविरोधात 4 फेब्रुवारीला देशद्रोह आणि कट रचण्याच्या आरोपात FIR दाखल केला होता. पोलिसांनी गूगलवरुन या टूलकिट संबंधीत माहिती शेअर करण्यास सांगितले आणि यानंतर दिशाला अटक झाली.

दिशा, निकिता, धालीवाल आणि शांतनुवर काय आरोप आहेत?
या प्रकरणात ग्रेटा व्यतिरिक्त आतापर्यंत 4 पात्र समोर आले आहेत...

1. दिशा रवीवर टूलकिट एडिट करण्याचा आरोप
दिल्ली पोलिसांनी दिशा रवीला रविवारी बंगळुरूमध्ये अटक केली. या अटकेसह 11 दिवसांनंतर टूलकिट प्रकरण पुन्हा चर्चेत आले. दिशाला रविवारी कोर्टाने 5 दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले.

कोण आहे दिशा : 22 वर्षांची दिशा BBA विद्यार्थीनी आहे. तिने क्लायमेट अॅक्टिव्हिस्ट ग्रुप फ्रायडे फॉर फ्चूयरची इंडिया विंग 2019 मध्ये सुरू केली होती. या इंटरनॅशनल ग्रुपची संस्थापक ग्रेटा थनबर्ग आहे.

काय आहे आरोप : दिल्ली पोलिसांनुसार, शेतकरी आंदोलनाविषयी जी टूलकिट ग्रेटाने शेअर केली होती. ती दिशानेच एडिट आणि सर्कुलेट केली होती. यासाठी तिने व्हॉट्सअप ग्रुपही बनवला होता. दिशाने हे टूलकिट टेलीग्राम अॅपच्या माध्यमातून ग्रेटापर्यंत पोहोचवले होते. मात्र ज्यावेळी ही टूलकिट सार्वजनिक झाले तेव्हा दिशाने ग्रेटाला हे टूलकिट हटवण्यास सांगितले. नंतर दिशाने टूलकिटसाठी बनवलेले व्हॉट्सअप ग्रुपही डिलीट केले.

दिशाचे म्हणणे काय आहे: रविवारी दिशाला दिल्लीच्या कोर्टात हजर केले तेव्हा ती रडायला लागली. दिशाने न्यायाधिशांना सांगितले की, तिने या गूगल डॉक्यूमेंटच्या केवळ 2 ओळी संपादित केल्या होता. शेतकरी आंदोलनाला समर्थन देणे हाच तिचा हेतू होता.

2. निकिता जेकब
दिशा रवीच्या अटकेनंतर दिल्ली पोलिसांना टूलकिट केसमध्ये निकिता जेकबचा शोध घेत आहेत.

कोण आहे निकिता : निकिता मुंबईमध्ये राहते. ती महाराष्ट्र आणि गोवा स्टेट बार काउंसिलमध्ये रजिस्टर्ड आहे. ती एक सामाजिक न्याय आणि हवामान कार्यकर्ती आहे. तिच्या सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये म्हटले आहे की, ती मुंबई उच्च न्यायालयात वकील आहे.

काय आरोप आहेत: दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की निकिताने टूलकिटचे संपादन केले. याशिवाय निकिता धलीवालसोबतच्या व्हर्चुअल मीटिंगमध्येही सहभागी होती. 11 फेब्रुवारीला दिल्ली पोलिसांची सायबर सेलची टीम मुंबईच्या गोरेगाव येथील निकिताच्या घरी गेली आणि तेथे ठेवलेल्या गॅझेटची तपासणी केली. या तपासात हे खुलासे झाले आहेत.

निकिताचे म्हणणे काय आहे : निकिताने मुंबई उच्च न्यायालयात ट्रांजिट बेलसाठी याचिका दाखल केली आहे. तिने दिल्ली न्यायालयात अर्ज दाखल करता यावा म्हणून त्यांनी 4 आठवड्यांचा अटकपूर्व जामीन मागितला आहे. निकिता म्हणते की, तिने तपासात सहकार्य केले आहे आणि तिच्यावरील आरोप निराधार आहेत. मीडिया ट्रायल आणि राजकीय सूड घेण्यासाठी तिला अटक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

3. शांतनु
टूलकिट प्रकरणात हे तिसरे नाव आहे. शांतनुविषयी अजून जास्त माहिती समोर आलेली नाही.

कोण आहे शांतनु : शांतनु निकिता आणि दिशाचा साथीदार आहे एवढेच दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.

आरोप काय आहे: दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलचे सहआयुक्त प्रेम नाथ यांच्या मते, शंतनूने एक ईमेल अकाउंट तयार करून त्याद्वारे एक टूलकिट तयार केली. त्यानंतर त्याने ही टूलकिट दिशा, निकिता आणि इतरांसह शेअर केली. धालीवाल यांच्याशी झूमवर शंतनूने मीटिंग केली होती.

4. एमओ धालीवाल यांच्यावर टूलकिट बनवण्याचा आरोप
टूलकिट केसमध्ये अखेरची कडी एमओ धालीवाल आहेत. दिल्ली पोलिसांच्या तपासात धालीवाल यांच्या नावाचा खुलासा झाला आहे.

कोण आहे धालीवाल : कॅनडामध्ये जन्मलेला धालीवाल डिजिटल ब्रांडिंग क्रिएटिव्ह एजेंसी स्कायरॉकेटमध्ये डायरेक्टर आहे. तो पोएटिक जिस्टिस फाउंडेशनचा संस्थापकही आहे. ज्याने शेतकरी आंदोलनासंबंधीत वादग्रस्त टूलकिट बनवली आहे. सप्टेंबर 2020 मध्ये धालीवालने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले होते की, मी खालिस्तानी आहे.

काय आहे आरोप : वादग्रस्त टूलकिट धालीवालच्या संघटनेने बनवली होती असे दिल्ली पोलिसांच्या तपासाच्या हवाल्यापूर्वी समोर आले होते. मात्र, सोमवारी तपासणीनंतर पोलिसांनी वृत्त दिले की, शांतनुने टूलकिट बनवली. मात्र, पोलिस धालीवाल यांच्या ‘पोएटीक जस्टिस फाउंडेशन’ या संस्थेला खलिस्तानी मानतात. तपासात समोर आले की, प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर झूम बैठक आयोजित करण्यात आली होती. धालीवाल, निकिता आणि दिशा यांच्यासह इतरांनी यात हजेरी लावली. या बैठकीत शेतकर्‍याच्या मृत्यूवर चर्चा झाली. प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर सोशल मीडियावर खळबळ माजवणे हा या बैठकीचा उद्देश होता.

धालीवाल यांचे काय म्हणणे आहे : एमओ धालीवाल यांचे म्हणणे आहे की, पोएटिक जस्टिस फाउंडेशन त्यांनी नाही तर त्यांची मैत्रिण अनिता लाल यांनी बनवले होते.

बातम्या आणखी आहेत...