आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Farmers Protest (Kisan Andolan); Maharashtra Mumbai Tractor Rally Latest Update | Kisan Republic Day 2021 Parade And Andolan Today 26 January

7 राज्यात शेतकऱ्यांची रॅली:अमृतसरमध्ये ट्रॅक्टर रॅलीदरम्यान अपघात, 2 महिलांचा मृत्यू; हरियाणातील फरीदाबादमध्ये कलम 144 लागू

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसरच्या वल्ला गावात रॅलीदरम्यान एक ट्रॅक्टर अनियंत्रित झाले. यात दोन महिलांचा मृत्यू झाला. - Divya Marathi
अमृतसरच्या वल्ला गावात रॅलीदरम्यान एक ट्रॅक्टर अनियंत्रित झाले. यात दोन महिलांचा मृत्यू झाला.
  • मुंबईतील आझाद मैदानावर शेतकऱ्यांनी केले ध्वजारोहण

दिल्लीच्या 3 बॉर्डरवर ट्रॅक्टर परेडसाठी पंजाब, हरियाणा आणि राजस्थानचे शेतकरी दाखल झाले. यादरम्यान शेतकऱ्यांनी दिल्लीतील लाल किल्यावर ताबा मिळवला आणि प्रचंड गोंधळ झाला. सकाळी राष्ट्रपतींनी ज्या लाल किल्यावर तिरंगा झेंडा फडकावला होता, त्याच ठिकाणी आंदोलक शेतकऱ्यांनी खालसा पंथाचा झेंडा फडकावला. दरम्यान, दिल्लीसोबतच देशातील सात राज्यात शेतकऱ्यांनी आंदोलने केली आहेत. पंजाबमध्ये शेतकरी रॅलीदरम्यान ट्रॅक्टर पलटून दोन महिलांचा मृत्यू झाला. तर, आंदोलनामुळे फरीदाबादमध्ये कलम 144 लागू करण्यात आली आहे.

शेतकरी आंदोलनावर 7 राज्यातील रिपोर्ट

उत्तर प्रदेश: समाजवादी पार्टीचा ट्रॅक्टर मार्च

उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी प्रत्येक जिल्ह्यात ट्रॅक्टर रॅली काढत आहे. दरम्यान, लखनऊमध्ये गोंधळ झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. बस्ती, शामली आणि सिद्धार्थनगरमध्ये सपा कार्यकर्ते आणि पोलिसांत झडप झाली. तर, गाजियाबादमध्ये दगडफेक करुन आंदोलकांनी बॅरिकेडची तोडफोड केली.

राजस्थान: शेतकरी दिल्लीकडे रवाना

अलवरच्या शाहजहांपूर बॉर्डरवरुन सकाळी 11 वाजेपासून शेतकरी दिल्लीकडे रवाना होऊ लागले. पहिले ट्रॅक्टर आंदोलनात मृत्यू झालेल्या लोकांच्या नावाने निघाला. यानंतर अनेक ट्रॅक्टर बॉर्डरवरुन रवाना झाले. हरियाणा पोलिसांनी जयपूर-दिल्ली हायवेवरुन एक-एक ट्रॅक्टरला पुढे जाऊ दिले. परेडमध्ये ट्रॅक्टरपेक्षा जास्त जीप आणि कार होत्या.

महाराष्ट्र: आजाद मैदानानवर शेतकऱ्यांचे ध्वजारोहण

नाशिकवरुन 180 किलोमीटरचा प्रवास करुन मुंबईतील आझाद मैदानावर आलेले शेतकरी आता आपापल्या घरी निघाले आहेत. परंतु, मंगळवारी नाशिककडे रवाना होण्यापूर्वी अंदाजे दहा हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी ध्वजारोहण केले. यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.

झारखंड : रांचीमध्ये ट्रॅक्टर आणि मोटरसायकलवरुन रॅली

शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी रांचीतून मोठा मार्च निघाला. दुपारी दोन वाजेपासून डाव्यांनी राजेंद्र चौकातून मोरहाबादीपर्यंत रॅली काढली. तर, राजदने बिरसा चौकापासून मोरहाबादीपर्यंत मार्च काढला.

हरियाणा: ट्रॅक्टरवर कोणताच झेंडा तिरंग्यापेक्षा उंच नाही

सिंघू बॉर्डरकडे निघताना शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसोबतच कार आणि बाइकदेखील आणल्या होत्या. यादरम्यान प्रत्येक गाडीवर तिरंगा लावण्यात आला होता. याशिवाय अनेक शेतकऱ्यांनी आपापल्या युनियनचे झेंडेदेखील लावले होते. यापूर्वीच शेतकरी नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, कोणताच झेंडा तिरंग्यापेक्षा उंच नसावा. तिकडे, फरीदाबादमध्ये गोंधळानंतर कलम 144 लागू करण्यात आली आहे.

पंजाब : अमृतसरमध्ये दोन महिलांचा मृत्यू

अमृतसरच्या वल्ला गावात शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले.

छत्तीसगढ़ : रायपूरमध्येही ट्रॅक्टर मार्च

रायपुरमध्ये डाव्यांशी संबंधित काही शेतकरी संघटनांनी ट्रॅक्टर मार्च काढला.

बातम्या आणखी आहेत...