आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Farmers Protest (Kisan Andolan); Rahul Gandhi On BJP Party IT Cell Chief Amit Malviya And Narendra Modi Government; News And Live Updates

राहुल गांधींच्या चुकीवर भाजपचा टोमणा:काँग्रेस नेत्याने शेतकरी आंदोलनाचा जुना फोटो केला शेअर, संबित म्हणाले - इतरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवणे ही त्यांची सवय

नवी दिल्ली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेतकरी आंदोलन हे एक प्रोपोगंडा - आयटी प्रमुख

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनावरुन पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, तो खंबीर, तो निर्भय आहे, तो इथे आहे... भारत भाग्य विधाता! राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये शेतकरी आंदोलनाचे फेब्रुवारी महिन्यातील फोटो लावले आहे. परंतु, त्यांना रविवारी मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या महापंचायतीचा संदर्भ द्यायचे होते, असे ट्विटवरुन दिसून येत आहे.

या ट्विटमुळे राहुल गांधी पुन्हा एकदा ट्रोल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालविय यांनी राहुल गांधीवर पलटवार केला आहे. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनीदेखील राहुल गांधी यांच्यावर टोमणा मारला आहे.

शेतकरी आंदोलन हे एक प्रोपोगंडा - आयटी प्रमुख
भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधींच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले. राहुल गांधी यांनी वापरलेले फोटो खूप जुने असल्याचा दावा मालवीय यांनी केला आहे. महापंचायतीसाठी जुने फोटो वापरावे लागते यावरुन शेतकरी आंदोलनाच्या नावावर सुरु असलेला प्रोपोगंडा काम करत नसल्याचा आरोप ही त्यांनी यावेळी केला.

खोटे बोलण्याच्या राजकारणात राहुल गांधींचा हात - संबित यांचा आरोप
राहुल गांधी यांच्यावर टीका करताना संबित पात्रा म्हणाले की, आपली संघटना पुढे न नेणे, संघटनेला अध्यक्षांशिवाय ठेवणे, कठोर परिश्रम न करणे आणि इतरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपले काम चालवणे ही राहुल गांधी यांची सवय झाली असल्याचा टोला पात्रा यांनी लगावला आहे. देशात जेंव्हा जेंव्हा गोंधळाचे आणि खोटे राजकारण होते, तेंव्हा त्यात राहुल गांधी यांचा हात असतो असा आरोपही पात्रा यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...