आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Farmers Protest (Kisan Andolan) Tractor Rally Supreme Court Update | Supreme Court Hearing On Farmers' Tractor Rally On R Day Today

ट्रॅक्टर रॅलीमध्ये कोर्टाचा हस्तक्षेप नाही:​​​​​​​सुप्रीम कोर्टाने सरकारला म्हटले - 'रॅलीच्या विरोधात अर्ज मागे घ्या, याविषयी पोलिसांना निर्णय घेऊ द्या'

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेतकरी नेते म्हणाले- मेळावा शांततापूर्ण असेल

कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत असलेले शेतकरी 26 जानेवारीला ट्रॅक्टर रॅली काढतील. याविरोधात केंद्र सरकारकडून दिल्ली पोलिसांनी सुप्रीम कोर्टात अर्ज केला होता. यावर बुधवारी सुनावणी झाली.

चीफ जस्टिस एस ए बोबडे यांच्या बेंचने म्हटले, 'शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली किंवा एखाद्या प्रदर्शनाच्या विरोधात सरकारच्या अर्जावर कोणताही अर्ज जारी करणार नाही. आम्ही यापूर्वीच सांगितले आहे की, याविषयी पोलिसांना निर्णय घेऊ द्यावा'

सरकारने अर्ज मागे घेतला
कोर्टाने सरकारला म्हटले, 'तुम्ही अर्ज परत घ्यायला हवा. या प्रकरणात तुम्ही अथॉरिटी आहात, तुम्हीच डील करा. कोर्टाने आदेश द्यावा असे हे प्रकरण नाही.' कोर्टाच्या या कमेंटनंतर सरकारने अर्ज मागे घेतला.

कोर्ट रुम
शेतकरी महापंचायतचे वकील :
शेतकरी मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने जी कमिटी बनवली आहे, त्यातील एक सदस्य बाहेर पडल्यानंतर किसान महापंचायतने पुन्हा कमिटी बनवण्यासाठी अर्ज केला आहे.

चीफ जस्टिस -

  • ती हिच संघटना आहे का, जिने काल कमिटीच्या संविधानाला नाकारले होते.
  • आम्ही कमिटीला अधिकार दिला आहे की, शेतकऱ्यांचे ऐका आणि आम्हाला रिपोर्ट द्या. यामध्ये भेदभावचा काय प्रश्न आहे? कोर्टाला बदनाम करु नका. (कमिटी भेदभावच्या आरोपांवर)
  • कमिटीच्या सदस्यांना निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही. जर तुम्हाला कमिटीसमोर जायचे नाही तर जाऊ नका. पण अशा प्रकारे बदनाम करु नका.
  • तुम्ही कमिटीच्या कोणत्याही सदस्यावर केवळ यासाठी आरोप लावत आहेत, कारण त्यांनी कृषी काद्यांवर आपले मत दिले होते. आम्ही कमिटीमध्ये एक्सपर्ट नियुक्त केले आहेत, कारण आम्ही या प्रकरणात एक्सपर्ट नाही.
  • आम्ही कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीवर बंदी घातली आहे. तुम्ही प्रदर्शन करू शकता, परंतु शांतता कायम ठेवली पाहिजे.

प्रशांत भूषण (शेतकरी संघटनांचे वकील): शेतकऱ्यांना आउटर रिंग रोडवर प्रजासत्ताक दिन साजरा करायचा आहे. यावेळी शांतता भंग करण्याचा कोणताही प्रयत्न केला जाणार नाही.

शेतकरी नेते म्हणाले- मेळावा शांततापूर्ण असेल
बुधवारी सलग दुसर्‍या दिवशी शेतकरी नेते दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या पोलिसांशी भेट घेत आहेत. यापूर्वी मंगळवारी झालेल्या बैठकीत पोलिसांनी शेतकरी नेत्यांना ट्रॅक्टर रॅली काढू नये, असे आवाहन केले. या बैठकीनंतर क्रांतिकारक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दर्शन पाल म्हणाले - ट्रॅक्टर रॅली काढू, पण आंदोलन शांततेत होईल असे पोलिसांना आश्वासन दिले आहे.

दिल्ली पोलिसांचे तर्क काय?
कोणतीही रॅली किंवा असा विरोध जो प्रजासत्ताक दिन समारंभात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, तो देशाला लाजिरवाना करणारा असेल. यामुळे जगभरात देशाची बदनामी होईल. कायदा व्यवस्था खराब होण्याची शक्यता आहे.

विविध रिपोर्ट्सचा हवाला देत म्हटले आहे की, अनेक शेतकरी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी लाल किल्ल्यापर्यंत पोहोचण्याची तयारी करत आहेत.

शेतकरी नेता काय म्हणतात?
26 जानेवारीला ट्रॅक्टर रॅली दिल्लीच्या आउटर रिंग रोडवर तिरंग्यासोबत काढली जाईल.
स्वातंत्र दिनाच्या समारोहात कोणताही अडथळा आणला जाणार नाही.

बातम्या आणखी आहेत...