आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
26 जानेवारीला ट्रॅक्टर परेडदरम्यान हिंसा कशी झाली? याचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिस लाल किल्ल्यावर सीन री-क्रिएट करण्यात आला. हिंसा पसरवणारे आरोपी दीप सिद्धू आणि इक्बाल सिंह यांना घेऊन दिल्ली पोलिस हिंसा झालेल्या ठिकाणी गेले. यापूर्वी दीप सिद्धू आणि इकबाल सिंह यांची चाणक्यपूरी येथील क्राइम ब्रांचमध्ये जवळपास एक तास चौकशी करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी लाल किल्ला सिंहे प्रकरणी चौकशी क्राइम ब्रांचकडे सोपवली आहे.
#WATCH Delhi: 26th January violence accused Iqbal Singh and Deep Sidhu being taken from Delhi Police Crime Branch, Chanakyapuri. pic.twitter.com/9IZfThL8Hn
— ANI (@ANI) February 13, 2021
दीप सिद्धूला 8 फेब्रुवारी रोजी अटक केली होती
दीप सिद्धूला हिंसाचारानंतर 15 दिवसांनी सोमवारी रात्री 10.40 वाजता पोलिसांनी करनाल बायपास येथून अटक केली आणि मंगळवारी सकाळी अटकेची माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी या प्रकरणातील दुसरा प्रमुख आरोपी इक्बाल सिंग याला होशियारपूर येथून अटक करण्यात आली होती. 3 फेब्रुवारीला दिल्ली पोलिसांनी दीप सिद्धू, गुरुजोत सिंह, गुरजंत सिंह आणि जगबीर सिंग यांच्यावर प्रत्येकी 1 लाख आणि जगबीर सिंह, बूटा सिंह, सुखदेव सिंह आणि इक्बाल सिंग यांच्यावर 50-50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
सिद्धूवर लाल किल्ल्यामध्ये समाजकंटकांना भडकावल्याचा आरोप आहे. समाजकंटकांनी किल्ल्यावर धार्मिक झेंडा लावला होता आणि हिंसाही केली होती.
अमेरिकेतून व्हिडिओ पोस्ट करायचा सिद्धू
पोलिसांनी सांगितले की, 26 जानेवारीच्या घटनेनंतर सिद्धू कुठेही दिसला नव्हता. दरम्यान तो सोशल मीडियावर सातत्याने व्हिडिओ अपडेट करत होता. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याचा एक व्हिडिओ समोर आला. पोलिसांनी तपास केला तर हा व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी तो आपल्या गर्लफ्रेंड आणि तिच्या मोबाइलचा वापर करत होता. त्याचा फेसबुक आयडी अनेक मोबाइलमध्ये ओपन होता. तो व्हिडिओ बनवून आधी गर्लफ्रेंडला व्हॉट्सअपवर टाकत होता. ती कॅलिफोर्नियामध्ये होती. यानंतर गर्लफ्रेंड तिथून तिच्या मोबाइलवरुन तो व्हिडिओ पोस्ट करायची.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.