आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Farmers Protest Latest News Today 4 February: Kisan Andolan Delhi Burari LIVE Update | Haryana Punjab Farmers Delhi Chalo March

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी आंदोलन:गाजीपूर बॉर्डरवर गेलेल्या 15 नेत्यांना पोलिसांनी अडवले; अमेरिकेने केली नवीन कृषी कायद्यांची स्तुती

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'जेव्हा राजा घाबरतो, तेव्हा तटबंदीची मदत घेतो'

कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 71 वा दिवस आहे. परंतु, ना शेतकरी मागे हटायला तयार आहेत, ना केंद्र सरकार कायदे परत घ्यायला तयार आहे. दरम्यान, आज गाजीपूर बॉर्डरवर हालचाली वाढल्या आहेत. शिरोमणी अकाली दलचा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री हरसिरत कौर बादलसह 10 विरोधी पक्षातील 15 नेते आज शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गाजीपूर बॉर्डरकडे जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले. यानंतर सर्व नेते माघारी परतले आहेत.

तिकडे, कायदे परत घेण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी हरियाणातील जींद जिल्ह्यातील कंडेला गावात महापंचायत बोलावली होती. यात भा रतीय शेतकरी यूनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की, आता कृषी मंत्री किंवा इतर मंत्र्यांशी चर्चा होणार नाही. आता पुढील चर्चा थेट पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांशी होणार.

अमेरिकेने केली स्तुती

नवीन कृषी कायद्यावरुन देशात सुरू असलेल्या गोंधळादरम्यान अमेरिकेने कृषी कायद्यांची स्तुती केली आहे. अमेरिकेने म्हटले की, या शेतीविषयक सुधारणेमुळे भारतीय बाजारपेठ बळकट होईल आणि खासगी गुंतवणूकही वाढेल.

'जेव्हा राजा घाबरतो, तेव्हा तटबंदीची मदत घेतो'

टिकैत पुढे म्हणाले की, 'सध्या शेतकरी कृषी कायदे परत घेण्याची मागणी करत आहेत, जेव्हा गादी परत करण्याची मागणी करतील, तेव्हा सरकार काय करेल ? जेव्हा एखादा राजा घाबरतो, तेव्हा तो तटबंदीची मदत घेतो. अशीच परिस्थिती सध्या देशात सुरू आहे. दिल्ली बॉर्डरवर जी घेराबंदी केली आहे, अशी घेराबंदी आपल्या शत्रुंसाठीही कोणी करत नाही. पण, आम्ही शेतकरी घाबरणार नाहीत.

महापंचायतीत 5 प्रस्ताव पास

1.सरकारने तीनही कृषी कायदे मागे घ्यावे

2. MSP साठी कायदा बनवावा

3. स्वामीनाथन आयोग लागू करावा

4. पकडलेल्या शेतकऱ्यांना आणि त्यांच्या जप्त केलेल्या ट्रॅक्टर्सला सोडावे

5. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे

बातम्या आणखी आहेत...