आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीकरी बॉर्डरवर रविवारी एका शेतकऱ्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांना त्या शेतकऱ्याजवळ एक सुसाइड नोटही सापडली आहे. यात लिहीले, 'भारतीय शेतकरी यूनियन जिंदाबाद. मोदी सरकार फक्त तारखा देत आहे. कोणालाच माहित नाही, हे काळे कायदे कधी परत घेणार.' पोलिसांनी सांगितल्यानुसार, कर्मवीर सिंह (52) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
नवी कृषी कायद्यांविरोधात आज शेतकरी आंदोलनाचा 74वा दिवस आहे. आज शेतकऱ्यांनी चरखी दादरीमध्ये महापंचायतीचे आयोजन केले आहे. या महापंचायतमध्ये भारतीय शेतकरी यूनियनचे प्रवक्ता राकेश टीकैत सामील होणार आहेत. महापंचायतमध्ये जाण्यापूर्वी टीकैत यांनी शेतकरी क्रांती 2021ची घोषणा केली आहे. शनिवारी झालेल्या चक्काजामनंतर गाजीपूर बॉर्डरवर गेलेल्या राकेश टिकैत म्हणला की, 26 जानेवारीला आम्ही दिल्लीत 20 हजार ट्रॅक्टरची रॅली काढली होती. पण, आता आता आमचे टार्गेट 40 लाख ट्रॅक्टरची रॅली काढण्याचे आहे. तसेच, टीकैत यांनी सर्व शेतकऱ्यांना आपल्या ट्रॅक्टरवर 'शेतकरी क्रांती 2021' लिहण्याचे आव्हानदेखील केले.
NGT च्या कार्यालयांवरदेखील ट्रॅक्टर जाणार
टिकैत गाजीपूरवर दिल्ली-एनसीआरच्या त्या शेतकऱ्यांना भेटले, जे नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल (NGT) च्या निर्णयामुळे नाराज आहेत. NGT ने 10 वर्षांपूर्वीच्या डीझेल वाहनांवर बंदी घालण्यास सांगितले आहे, यात ट्रॅक्टरचा समावेश आहे. याबाबत बोलताना टीकैत म्हणाले की, 'शेतात चालणारे ट्रॅक्टर आता दिल्लीमध्ये NGT च्या कार्यालयांवर जाणार. 10 वर्षे जुन्हा गाड्यांना आणि ट्रॅक्टरला बंद करुन त्यांना कोर्पोर्टला मदत करायची आहे. पण, आम्ही हे होऊ देणार नाहीत. आमच्या आंदोलनात 10 वर्षे जुने ट्रॅक्टरदेखील धावणार.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.