आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Farmer's Protest : Meeting Of All Opposition Parties Tomorrow In Delhi Under The Leadership Of Sharad Pawar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विरोधी पक्षांची बैठक:उद्या शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत विरोधी पक्षांची महत्वाची बैठक, शेतकरी आंदोलनावर विरोधकांची भूमिका ठरवणार

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीत मागील 13 दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात सरकारला अपयश आल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. कृषी कायद्याबाबत विरोधकांची रणनिती ठरवण्यासाठी उद्या दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत भारतीय कम्यूनिस्ट पक्ष, काँग्रेस यांसह अनेक विरोधी पक्षाचे नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान या बैठकीनंतर शरद पवार अन्य राजकीय पक्षाच्या नेत्यांसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार असल्याचे समजते. शरद पवार संध्याकाळी 5 वाजता ही भेट होणार असून यावेळी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

शरद पवार महाराष्ट्राची भूमिका मांडतील

दरम्यान 'शरद पवार राष्ट्रपतींना भेटून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतील. राष्ट्रपतींना अधिकार असतील तर ते प्रश्न सोडवतील. शरद पवार राष्ट्रपतींची भेट घेत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांना दिल्लीत जाऊन कोणाला भेटायची गरज नाही, शरद पवारच महाराष्ट्राची भूमिका मांडतील' असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser