आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
26 जानेवारीला शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यान झालेल्या हिंसाचाराप्रकरणी बुधवारी पोलिसांनी दुसऱ्या एका आरोपीला तब्यात घेले आहे. इक्बाल सिंह असे आरोपीचे नाव असून, त्याची माहिती सांगण्याऱ्याला पोलिसांनी 50 हजार रुपये बक्षीसाची घोषणा केली होती. इक्बालला पंजाबमधील होशियारपूरमधून अटक केले. यापूर्वी पोलिसांनी पंजाबी सिंगर दीप सिद्धूला अटक केले आहे.
दीप सिद्धूला पोलिसांनी करनाल बायपासवरुन ताब्यात घेतले. सिद्धूवर लाल किल्यात आंदोलकांना भडकावण्याचा आरोप आहे. आंदोलकांनी लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा भडकावून लोडफोड केली होती.
सिद्धू अमेरिकेतून व्हिडिओ अपलोड करायचा
सिद्धू लाल किल्ल्यातील घटनेनंतर फरार होता, पण त्याच्या फेसबुक अकाउंटवर सतत व्हिडिओ अपलोड हात असायचे. वृत्तसंस्थेच्या सुत्रांनी सांगितले की, सिद्धू कॅलिफॉर्नियामधून आपल्या एका मैत्रिणीकडून हे सर्व व्हिडिओ अपलोड करायचा. तसेच, पोलिसांना चकवा देण्यासाठी तो नेहमी आपली लोकेशन पदलत होता. त्यामुळेच सिद्धूची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी 1 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. अटक झाल्यानंतर पोलिसांनी सिद्धूला कोर्टात हजर केले. तेथे कोर्टाने त्याला 7 दिवसांच्या रिमांडवर पाठवले आहे.
शेतकरी आंदोलनात 77 दिवसांत 70 मृत्यू झाले
सिंघु बॉर्डरवर मंगळवारी अजून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. हरिंदर(50) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. यासोबतच कृषी कायद्याविरोधात मागील 77 दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात आतापर्यंत 70 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यातील काहींनी आत्महत्या केली, तर काहींचा आजारपणामुळे मृत्यू झाला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.